'वाराणसी' एस एस राजामौलींच्या सिनेमाचं टायटल घोषित, महेश बाबूचा व्हिडीओ टीझर आऊट
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2025 09:13 IST2025-11-16T09:10:27+5:302025-11-16T09:13:28+5:30
सिनेमाचं नाव 'वाराणसी' असल्याचंही जाहीर झालं. या सोहळ्याला प्रियंकाच्या लूकने लक्ष वेधलं.

'वाराणसी' एस एस राजामौलींच्या सिनेमाचं टायटल घोषित, महेश बाबूचा व्हिडीओ टीझर आऊट
ग्लोबल स्टार प्रियंका चोप्रा अनेक वर्षांनी दाक्षिणात्य सिनेमात दिसणार आहे. एस एस राजामौलींच्या सिनेमात ती महेश बाबू आणि पृथ्वीराज सुकुमारन या दोन्ही सुपरस्टार्ससोबत स्क्रीन शेअर करणार आहे. कालच हैदराबाद येथे भव्य इव्हेंटमध्ये सिनेमाचा टीझर लाँच करण्यात आला. सिनेमाचं नाव 'वाराणसी' असल्याचंही जाहीर झालं. या सोहळ्याला प्रियंकाच्या लूकने लक्ष वेधलं.
महेश बाबू दाक्षिणात्य सुपरस्टार आहे. तर 'बाहुबली'फेम एस एस राजामौलींसोबत हा त्याचा पहिलाच सिनेमा आहे. सिनेमात महेश बाबू रुद्र ही भूमिका साकारत आहे.. तर पृथ्वीराज सुकुरमारन यामध्ये खलनायक 'कुंभा'च्या भूमिकेत आहे. सिनेमातील महेश बाबूचा लूक आता रिव्हील झाला आहे. हातात त्रिशूल, डोळ्यात आग आणि नंदीवर बसून ते येताना दिसत आहे. अशा लूकमध्ये तो समोर आला आहे. यात रामायणचही थोडी झलक दिसत आहे. हा एक टाईम ट्रॅव्हलर अॅडव्हेंचर सिनेमा आहे.
सोशल मीडियावर 'वाराणसी'सिनेमाचा फर्स्ट लूक काही मिनिटात व्हायरल झाला आहे. सिनेमाच्या या इव्हेंटला ५० हजार लोक हजर होते. प्रियंका चोप्रा पांढऱ्या साडीत सुंदर दिसत होती. तर महेश बाबू आपल्या कुटुंबासोबत आला होता. महेश बाबूचा व्हिडीओ लूक रिव्हील झाला असून आता चाहत्यांना पृथ्वीराज आणि प्रियंकाच्या व्हिडीओची उत्सुकता आहे.