शाहरुख खानबाबतची ती अफवाच...

By Admin | Updated: February 14, 2017 22:19 IST2017-02-14T18:52:57+5:302017-02-14T22:19:37+5:30

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान बाहुबलीच्या सिक्वलमध्ये झळकणार असल्याच्या चर्चेला बाहूबलीच्या टीमकडून पूर्णविराम दिला आहे.

The rumor about Shah Rukh Khan ... | शाहरुख खानबाबतची ती अफवाच...

शाहरुख खानबाबतची ती अफवाच...

tyle="text-align: justify;">ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 14 - बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान बाहुबलीच्या सिक्वलमध्ये झळकणार असल्याच्या चर्चेला बाहूबलीच्या टीमकडून पूर्णविराम दिला आहे. शाहरुख खान बाहूबली -2 मध्ये पाहुण्या कलाकराच्या भूमिकेत असल्याच्या चर्चेला गोल्या दोन दिवसापासून उधान आले होते. मात्र आज चित्रपटात शाहरुखचा सहभाग नसल्याचं सिनेमा निर्मात्यानी ट्वीट करुन स्पष्ट केले आहे. दाक्षिणात्य सुपरस्टार मोहनलाल आणि सुरिया हे बाहुबली-2मध्ये कॅमिओ रोल प्ले करणार असल्याच्या अफवा काही दिवसांपूर्वी पसरल्या होत्या.

निर्मात्यांनी आपल्या ट्वीटमध्ये, आम्हाला या सिनेमात शाहरुखला घेण्यात आनंदच झाला असता, पण दुर्दैवानं असं काही नाही. ती केवळ अफवा आहे. असे शाहरुख खानच्या चित्रपटातील बातम्यांवर स्पष्टीकरण दिलं आहे. 

बाहुबली' या सिनेमाने भारतीय सिनेजगतात सर्व रेकॉर्ड मोडत कमाईचा नवा इतिहास रचला होता. तर प्रदर्शनाआधीच सॅटेलाइट्स राइट्सच्या माध्यमातून बाहुबली-2 ने 500 कोटी रूपये कमावले आहेत. बॉलीवूडचा दिग्दर्शक करण जोहर हा सिनेमा हिंदीत प्रदर्शित करणार असून यासाठी करणच्या धर्मा प्रोडक्शनने याचे अधिकार 120 कोटींना विकत घेतले आहेत. 

Web Title: The rumor about Shah Rukh Khan ...