Tiger Zinda Hai Movie Review : ​पुन्हा एकदा सलमान!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2017 09:15 AM2017-12-22T09:15:46+5:302023-08-08T19:28:38+5:30

सलमान खान आणि कॅटरिना कैफ स्टारर ‘टायगर जिंदा है’ हा चित्रपट आज रिलीज झाला. यशराज बॅनरचा हा चित्रपट ‘एक था टायगर’चा सीक्वल आहे.

Tiger Zinda Hai Movie Review: Salman again! | Tiger Zinda Hai Movie Review : ​पुन्हा एकदा सलमान!

Tiger Zinda Hai Movie Review : ​पुन्हा एकदा सलमान!

Release Date: December 22,2017Language: हिंदी
Cast: सलमान खान, कॅटरिना कैफ गिरीश कर्नाड, अंगद बेदी
Producer: आदित्य चोप्राDirector: अली अब्बास जफर
Duration: 2 तास 45 मिनिटGenre:
लोकमत रेटिंग्स
ong>-जान्हवी सामंत 

सलमान खान आणि कॅटरिना कैफ स्टारर ‘टायगर जिंदा है’ हा चित्रपट आज रिलीज झाला.   यशराज बॅनरचा हा चित्रपट ‘एक था टायगर’चा सीक्वल आहे. ‘सुल्तान’ फेम दिग्दर्शक अली अब्बास जफर हा चित्रपट दिग्दर्शित करतो आहे.  खरे तर रिलीजआधी ‘टायगर जिंदा है’ हाऊसफुल आहे. अ‍ॅडव्हान्स बुकिंगला प्रेक्षकांनी जोरदार रिस्पॉन्स दिलाय. यावरून टायगरला पाहायला प्रेक्षक आतूर आहेत, हे स्पष्ट होते. अर्थात समीक्षण वाचून चित्रपट पाहायचा की नाही, हे ठरवणारेही अनेकजण आहेत. तेव्हा चित्रपटगृहात जाण्यापूर्वी जाणून घेऊ यात,‘टायगर जिंदा है’ कसा आहे ते...

  ‘टायगर जिंदा है’ है पाहायला जाताना सर्व पूर्वग्रह घरी ठेवूनच तुम्ही चित्रपटगृहांत जायला हवे. म्हणजेच ‘टायगर जिंदा है’ हा ‘ट्यूबलाईट’ नाही, हे विसरूनचं  चित्रपटगृहाची पायरी चढायला हवी. ‘टायगर जिंदा है’मध्ये सलमान आहे आणि  आत्तापर्यंतच्या आपल्या चित्रपटांत सलमान जे काही करत  आलायं, ते सगळं या चित्रपटात आहे. म्हणजेच यात सलमानचे ‘ढिशूम ढिशूम’आहे. मधाळ संवाद आहेत. देशभक्ती आहे. मानवता आणि शांतीवरचे भाषण आहे. केवळ इतकेच नाही तर या चित्रपटातही सलमान महिला व मुलांना संकटातून बाहेर काढताना दिसणार आहे. शिवाय  नेहमीप्रमाणे शर्टलेसही होणार आहे. कदाचित त्याचमुळे चित्रपटाच्या कथेचे वास्तवाशी देणेघेणे नसूनही हा चित्रपट पाहणे मनोरंजक आहे. कारण यात सलमान आहे आणि म्हणूनच हा चित्रपट ‘पैसा वसूल’ चित्रपट आहे.  
इराकमध्ये चित्रपटाची कथा सुरू होते. पण सुरुवातीला काय संकट ओढवलेय, याचा जराही अंदाज येत नाही. दहशतवादी संघटना आयएससीने इराकमधील एका रूग्णालयाचा ताबा घेतलायं. याठिकाणी अमेरिकेचा एक बंधकही आहे. जखमी अवस्थेतील आयएससीचा म्होरक्याही आहे. शिवाय २५ भारतीय आणि १५ पाकिस्तानी  परिचारिकाही याठिकाणी अडकल्या आहेत. अशास्थितीत दहशतवाद्यांचा खात्मा करण्याच्या तयारीत असलेली अमेरिका भारत व पाकिस्तानला आपल्या परिचारिकांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी सात दिवसांचा वेळ देते आणि या मिशनमध्ये टायगर(सलमान खान)ची एन्ट्री होते.  भारताकडून टायगर तर पाकिस्तानकडून  झोया (कॅटरिना कैफ) या मिशनसाठी निवडली जाते. ‘टायगर जिंदा है’च्या पहिल्या भागात म्हणजे ‘एक था टायगर’मध्ये टायगर पाकिस्तानी आयएसआय एजंट झोयासोबत पळून जातो, असे दाखवले होते. दोघेही आपल्या प्रेमासाठी करिअर आणि देश पणाला लावतात, असा या चित्रपटाचा शेवट होता. त्यामुळे टायगर आपल्या ‘सेमी रिटायर्ड’ आयुष्यात आनंदी असतो. पण २५ भारतीय परिचारिकांना दहशतवाद्यांच्या तावडीतून सोडवण्याची वेळ येते, तेव्हा रॉला सर्वात आधी टायगरचं आठवतो.  टायगरच्या अंगावर अनपेक्षितपणे या भारतीय मोहिमेची जबाबदारी टाकली जाते. कारण  ही मोहिम केवळ आणि केवळ टायगरच फत्ते करू शकतो, असे टायगरचा बॉस शेनॉय याचा विश्वास असतो. टायगरही देशावरच्या प्रेमापोटी ही जबाबदारी स्वीकारतो. टायगर व झोया या मोहिमेवर निघतात. पुढे ही मोहिम कशी फत्ते होते, हे पाहायला तुम्हाला चित्रपटगृहातच जावे लागेल.
प्रामाणिकपणे सांगायचे तर ‘टायगर जिंदा है’च्या तुलनेत ‘एक था टायगर’ काकणभर सरस होता, असेच म्हणावे लागेल. कारण ‘एक था टायगर’ हा चित्रपट ‘टायगर जिंदा है’च्या तुलनेत वास्तवाच्या अधिक जवळ जाणारा होता. मनोरंजनाच्या कसोटीवर म्हणाल तर ‘एक था टायगर’ची बरोबरी करण्यात ‘टायगर जिंदा है’ यशस्वी झालाय. दिग्दर्शक अली अब्बास जफर याने राष्ट्रप्रेम,  शेजारी देशासोबतचे भारताचे संबंध, या बिघडलेल्या संबंधांचे मूळ अशा अनेक गोष्टींवर प्रकाश टाकला आहे आणि हे करताना चित्रपट कुठेही भरकटणार नाही, याचीही पूरेपूर काळजी घेतली आहे. ‘बजरंगी भाईजान’मध्ये भारत-पाक संबंधांवर विनोदी शैलीतून भाष्य करण्यात आले होते. या चित्रपटात मसाला स्टाईलने हे सगळे मुद्दे मांडले आहे.  चित्रपटात सलमानचा परफॉर्मन्स अफलातून आहे.  कॅटरिनानेही त्याच तोडीचा अभिनय केला आहे. चित्रपटात दमदार अ‍ॅक्शन आहे. विशेषत: सलमानच्या एन्ट्रीवेळी त्याची जंगली कोल्ह्यांशी दाखवलेली झुंज थराथर आहे. खलनायकाच्या रूपात सज्जाद डेलाफ्रूजही जमून आलाय. त्यामुळे   चित्रपट पाहण्यासारखा आहे.
देशभक्तीचा संदेश देणारा चित्रपट पाहायला आवडत असेल किंवा सलमानच्या अ‍ॅक्शनचे चाहते असाल तर हा चित्रपट तुम्ही चुकवता कामा नये.
 

Web Title: Tiger Zinda Hai Movie Review: Salman again!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.