​Review : ‘डिअर जिंदगी’ म्हणजे मनोरंजक आणि इमोशनल अत्याचार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2016 10:01 PM2016-11-24T22:01:07+5:302016-11-25T12:47:07+5:30

Dear Jindagi menace all in Shahrukh ; मनोचिकित्सक जहांगीर खान (शाहरुख खान)च्या एंट्रीपर्यमत हा चित्रपट रटाळ होत जातो, मात्र सुपरस्टारची एंट्री याला जिवंतपणा देते. यामुळे या चित्रपटाची वास्तव्यात सुरुवात येथून सुरू होते असे म्हणायला हरकत नाही.

​Review : ‘डिअर जिंदगी’ म्हणजे मनोरंजक आणि इमोशनल अत्याचार | ​Review : ‘डिअर जिंदगी’ म्हणजे मनोरंजक आणि इमोशनल अत्याचार

​Review : ‘डिअर जिंदगी’ म्हणजे मनोरंजक आणि इमोशनल अत्याचार

googlenewsNext
Release Date: November 25,2016Language: हिंदी
Cast: आलिया भट्ट, शाहरुख खान, अली झफर, आदित्य रॉय कपूर
Producer: धर्मा प्रॉडक्शनDirector: गौरी शिंदे
Duration: - 2 तासGenre:
लोकमत रेटिंग्स
-
trong>जान्हवी सामंत 


‘डिअर जिंदगी’ हा चित्रपट सिनेमॅटोग्राफर कायरा (आलिया भट्ट) हिची कथा आहे. मुंबईत राहणारी कायरा सिंगल असून ती आपल्या करिअर घडविण्याच्या प्रयत्नात आहे. परंतु अन्य चित्रपटांमधील नायिकांसारखी कायरा हसरी आणि मनमोकळ्या स्वभावाची नाही. सगळे असूनही ती नेहमीच असंतुष्ट असते. इतर मुलींच्या पालकांप्रमाणेच कायरचे आई-वडीलही तिच्या लग्नाच्या मागे असतात. सिड नावाच्या मुलाबरोबर कायरा रिलेशनशिपमध्ये असताना ती आपला प्रोड्युसर आणि सहकारी रघुवेंद्रसोबत (कुणाल कपूर)  सुद्धा नात्यात गुंतते. तरीही रघुवेंद्रबरोबर सिरिअस होण्याची तिची तयारी नसते. जीवनातल्या छोट्या छोट्या गोष्टींमधला आनंद घेण्यातही तिला रस नसतो. चित्रपटाची सुरुवात मंद आहे. चित्रपटातून हळूहळू कायराचा लहरी स्वभाव समोर येत जातो. तिची कामाप्रती असलेली आवड, तिचा विक्षिप्त स्वभाव, महत्त्वकांक्षा, तिच्या मनातली बेचैनी, रोमाँटिक रिलेशनशीपबद्दल असलेली अधिरता चित्रपटात हळूवारपणे उलगडत जाते. मुंबईमधल्या एका सिंगल वर्किंग वूमनचा स्ट्रगल आणि जगाचा तिच्याकडे पाहण्याचा दृष्टीकोण कसा असतो हे दाखविण्यासाठी दिग्दर्शकाने बराच वेळ घेतला आहे.

या चित्रपटाची संकल्पना आकर्षक आहे. परंतु काही गोष्टी चित्रपटात रिलेट करणे कठिण होते. आपल्या मित्रमैत्रिणीशी खूप जवळीक असूनही ते सीन्स सगळे अवघडलेले वाटतात.    मध्यांतराच्या अगोदर मनोचिकित्सक जहांगीर खान (शाहरुख खान)ची एंट्री होईपर्यंत हा चित्रपट फारच रटाळ वाटतो. मात्र सुपरस्टारची एंट्री याला जिवंतपणा देते. त्यामुळे खरा चित्रपट हा केवळ मध्यांतरानंतरच सुरु झाल्यासारखा वाटतो पण थोड्याच वेळा करता. त्याच्या आधीच्या सीन्समध्ये शाहरुख आपल्या भूमिकेत खूपच प्रभावी ठरतो पण लवकरच तो जीवनावर सोपे सल्ले आणि तत्वज्ञान झाडताना दिसतो. आलियाचे काम खूप प्रभावशाली आहे. तिच्या भूमिकेतील फटकळपणा आणि मनातील कोंडी ही तिने खूप उत्कृष्ठपणे सादर केली आहे. शाहरुखनेही त्याची भूमिका अगदी सहजपणे निभावली आहे. त्याने जीवन व प्रेमाबद्दलचे तत्त्वज्ञान समजावून सांगत असताना दोघांमधील केमेस्ट्रि चांगलीच जमली आहे. परंतु काही वेळानंतर त्यांचे संवाद आणि सीन्समध्ये तोचतोचपणा जाणवतो. बाकी कलाकारांना या चित्रपटात फारसा वाव नाही. 

 हा चित्रपट कायराच्या प्रवासावर आधारित असला तरीही तो एका टप्प्यानतंर तिच्या आयुष्यातल्या पुरुषांवर आणि नातेसंबंधावर येऊन घसरतो. मुळात कायराचे प्रोब्लेम्स जगावेगळे नसून ते अगदीच सर्वसामान्य असतात. त्याकरिता तिला मनोचिकित्सकाकडे जाण्याची फार गरज नसते. त्यावरही डॉ. जहंगीर खान साधारण सल्ले देतो. डिअर जिंदगी हा चित्रपट इंग्लिश विंग्लिश या चित्रपटाऐवढा रंजक आणि प्रभावशाली नाही हे पटकन कळून येते. परंतु आजच्या तरुणींचा दृष्टीकोन दाखवण्याचा चांगला प्रयत्न या चित्रपटातून दिग्दर्शक गौरी शिंदेने केला आहे. थोडक्यात इमोशनल अत्याचार सहन करण्याच्या मूडमध्ये असला तरच पाहा.  

Web Title: ​Review : ‘डिअर जिंदगी’ म्हणजे मनोरंजक आणि इमोशनल अत्याचार

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.