Ganpath Movie Review: काल्पनिक कथा अन् टायगर-क्रितीचा ॲक्शन धमाका, वाचा 'गणपत'चा रिव्ह्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2023 07:06 PM2023-10-21T19:06:16+5:302023-10-21T19:09:44+5:30

Ganpath Movie : बॉलिवूडचा ॲक्शन हिरो टायगर श्रॉफ आणि क्युट अभिनेत्री क्रिती सनॉन 'हिरोपंती' नंतर गणपत चित्रपटातून एकत्र दिसणार आहेत. त्यामुळे जाणून घ्या कसा आहे चित्रपट

Ganpath Movie Review: Fiction and Tiger-Kriti Action Blast, Read 'Ganpath' Review | Ganpath Movie Review: काल्पनिक कथा अन् टायगर-क्रितीचा ॲक्शन धमाका, वाचा 'गणपत'चा रिव्ह्यू

Ganpath Movie Review: काल्पनिक कथा अन् टायगर-क्रितीचा ॲक्शन धमाका, वाचा 'गणपत'चा रिव्ह्यू

Release Date: October 20,2023Language: हिंदी
Cast: टायगर श्रॉफ, क्रिती सनॉन, रहमान, जमील खान, गिरीश कुलकर्णी, जियाद बाकरी, रॉब होरॉक्स आणि अमिताभ बच्चन
Producer: वाशू भगनानी, जॅकी भगनानी, दीपशिखा देशमुख आणि विकास बहलDirector: विकास बहल
Duration: २ तास १६ मिनिटंGenre:
लोकमत रेटिंग्स

>> आकांक्षा कनोजिया

बॉलिवूडचा ॲक्शन हिरो टायगर श्रॉफ (Tiger Shroff) आणि क्युट अभिनेत्री क्रिती सनॉन (Kriti Sanon) 'हिरोपंती' नंतर गणपत (Ganpath Movie) चित्रपटातून एकत्र दिसणार आहेत. दरम्यान, कृतीने राष्ट्रीय पुरस्कार पटकावला आहे. या चित्रपटाचे वैशिष्ट्य असे की, निर्माता आणि दिग्दर्शक हे चित्रपटात कशा प्रकारे तांत्रिक गोष्टींचा वापर करून अॅक्शन सिक्वेन्स सादर करतात. एका काल्पनिक शहराची रचना, श्रीमंत-गरीब यांच्यातील दरी, महादेव आणि गणपती यांचे धार्मिक अधिष्ठान या सर्व गोष्टींवर नवी पिढी फिदा होईल. चला तर मग बघूया, नेमकी कशी आहे या चित्रपटाची कहाणी.

कथानक :
विकास बहल यांचा हा डिस्टोपियन अॅक्शन चित्रपट आहे, जो एका काल्पनिक काळाला पडद्यावर उतरवतो. या चित्रपटात युद्धानंतर उद्ध्वस्त झालेल्या जगाचे चित्रण करण्यात आलेले आहे. कथा सुरु होते ती, दलपती (अमिताभ बच्चन) यांच्यापासून. युद्धानंतर जग दोन भागांत विभागले गेले आहे. एक श्रीमंतांचे जग. दुसरे गरिबांचे, दलपती त्यांना भांडण्यासाठी जागा देतात ती म्हणजे, बॉक्सिंग रिंग. मात्र, सिल्व्हर सिटीचा दलाल गरिबांच्या जगात जाऊन तेथील बॉक्सिंगवर बेटिंग सुरू करतो. त्यानंतर आपला हिरो गुहु (टायगर श्रॉफ) गणपतची एंट्री होते. या सर्वांत जस्सी (क्रिती सनॉन) त्याला पूर्ण साथ देते.

लेखन व दिग्दर्शन
विकास बहल यांच्या आतापर्यंतच्या कहाण्या या अतिशय सरळपणे मांडण्यात आल्या आहेत. मात्र, या चित्रपटात ही कहाणी अतिशय गुंतागुतीची वाटते. डिस्टोपियन चित्रपटाच्या प्रकारातून ही कहाणी काल्पनिक रितीने दाखवण्यात आली आहे. डिस्टोपियन चित्रपटाचे वैशिष्ट्य असे असते की, तुम्ही चित्रपटाच्या प्रेक्षकांना काल्पनिक जगाचे हे वैशिष्ट्य माहीत असायला हवे; पण या गणपतबद्दल तसे घडत नाही.

अभिनय : टायगर श्रॉफच्या वाट्याला जे संवाद आलेत. त्याबद्दल असे वाटते की, तो स्वतःशीच बोलत बोलतो आहे. जेव्हा तो संवाद बोलत नाही तेव्हा तो नाचताना दिसतो. टायगरने उत्तम कामगिरी केली आहे. त्यासोबतच क्रिती सनॉनने टायगरची साथ चांगली दिली आहे. चित्रपटाचे संगीत फार विशेष नाही. क्रितीला बघून चांगले वाटते की, एक अभिनेत्री जेव्हा बाइक उडवते, अॅक्शन करते तेव्हा मजा वाटते. अमिताभ बच्चन यांच्याबद्दल काय बोलणार, त्यांच्या अभिनयाने तर चार चाँद लावले आहेत.

सकारात्मक बाजूः ॲक्शन, काल्पनिक जग, क्रितीचा अभिनय

नकारात्मक बाजूः संगीत, पटकथा

थोडक्यातः टायगर, क्रिती आणि अमिताभ बच्चन यांचा अभिनय ॲक्शनच्या तडक्यासह अनुभवयाचा असेल तर चित्रपट नक्की बघाच.

Web Title: Ganpath Movie Review: Fiction and Tiger-Kriti Action Blast, Read 'Ganpath' Review

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.