firki marathi movie review : प्रेक्षकांचीच घेतली फिरकी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2018 06:45 AM2018-03-09T06:45:22+5:302023-08-08T19:16:16+5:30

फिरकी या चित्रपटात पार्थ भालेराव, अथर्व उपासनी, अभिषेक भरते, हृषिकेश जोशी, ज्योती सुभाष, पुष्कर लोणारकर यांच्या मुख्य भूमिका आहेत.

firki marathi movie review: the spark took the audience | firki marathi movie review : प्रेक्षकांचीच घेतली फिरकी

firki marathi movie review : प्रेक्षकांचीच घेतली फिरकी

Release Date: March 09,2018Language: मराठी
Cast: पार्थ भालेराव, अथर्व उपासनी, अभिषेक भरते, हृषिकेश जोशी, ज्योती सुभाष, पुष्कर लोणारकर, अश्विनी गिरी
Producer: मौलिक देसाईDirector: सुनिकेत गांधी
Duration: २ तासGenre:
लोकमत रेटिंग्स
ong>प्राजक्ता चिटणीस 

संक्रात म्हटली की पतंग हे समीकरणच अनेकांचे ठरलेले असते. काही मुले तर या पतंगीच्या मागे प्रचंड वेडे झालेले आपल्याला पाहायला मिळतात. त्यांना पतंगापुढे काहीच दिवस नाहीत. अशाच पतंगबाजीच्या प्रेमात असलेल्या छोट्याशा मुलांची कथा फिरकी या चित्रपटात आपल्याला पाहायला मिळते. पतंग, मांजा विकत घेण्यासाठी पैसे जमवणाऱ्या आणि दिवसभर पतंगीच्याच मागे असणाऱ्या या मुलांची कथा अनेकांना नक्कीच त्यांच्या बालपणात घेऊन जाते. 
पतंग उडवताना काचेचा मांजा वापरल्याने अनेक पक्ष्यांना आपला जीव गमवावा लागतो. तसेच आजवर अनेक लोकांचे या माज्यांमुळे जीवदेखील गेले आहेत. त्यामुळे पतंग उडवताना काचेचा मांजा वापरू नये असा सामाजिक संदेश नेहमीच दिला जातो. पण तरीही फिरकी या चित्रपटात मुले काचेचा मांजा वापरताना आपल्याला दिसतात. या चित्रपटात काचेचा मांजा वापरण्यास प्रोत्साहन का देण्यात आले आहे हेच चित्रपट पाहाताना कळत नाही.
फिरकी या चित्रपटात प्रेक्षकांना गोविंद (पार्थ भालेराव), बंड्या (पुष्कर लोणारकर), टिचक्या (अथर्व उपासनी) या तीन मित्रांची कथा पाहायला मिळते. या तिन्ही मित्रांना अभ्यासापेक्षा फिरण्याची आणि विशेषतः पतंग उडवण्याची आवड असते. त्यांच्या शाळेमध्ये राघव (अभिषेक भरते) नावाचा मुलगा असतो. मस्ती करणे, शाळेतील मुलांना घाबरवणे एवढेच काम त्याला येत असेत. शाळेत कॉपी करताना त्याला पकडले जाते आणि त्याने कॉफी केले असल्याचे गोविंदने शिक्षकांना सांगितल्याने त्याचा गोविंदवर प्रचंड राग असतो. त्या दिवसापासून राघव गोविंद, बंड्या आणि टिचक्याला सतवायला लागतो. राघव हा सतत त्रास देत असल्याने गोविंद प्रचंड कंटाळलेला असतो. राघव हा दरवर्षी गावातील पतंग महोत्सवात जिंकत असतो. त्यामुळे यावर्षी मी राघवला हरवणारच असे गोविंद ठरवतो. राघवला गोविंद हरवतो का? पतंगबाजीत जिंकण्यासाठी तो काय काय मेहनत घेतो हे प्रेक्षकांना फिरकी या चित्रपटात पाहायला मिळते.
फिरकी या चित्रपटात पार्थ भालेराव, अथर्व उपासनी, अभिषेक भरते, हृषिकेश जोशी यांनी चांगले काम केले आहे. मावशीच्या भूमिकेतील ज्योती सुभाष नक्कीच प्रेक्षकांच्या लक्षात राहातात. चित्रपटाची कथा चांगली असली तरी चित्रपटात पुढे काय होणार हे आपल्याला चित्रपट सुरू झाल्यावर काहीच मिनिटात कळते. त्यामुळे पुढे काय होणार याची उत्सुकता आपल्याला लागत नाही. सिनेमातील गाणी चांगली असली तरी कथेत ती चपलखपणे बसत नाहीत. एक चांगला विषय असला तरी तो तितकासा प्रभावीपणे मांडण्यात आलेला नाहीये असे चित्रपट पाहाताना नक्कीच जाणवते. 

Web Title: firki marathi movie review: the spark took the audience

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.