अर्जुन-श्रद्धाच्या हाफ गर्लफ्रेंडचे पहिले पोस्टर रिलीज

By Admin | Updated: February 14, 2017 17:08 IST2017-02-14T17:05:23+5:302017-02-14T17:08:28+5:30

बेस्ट सेलर पुस्तकांचे प्रसिद्ध लेखक चेतन भगत यांच्या हाफ गर्ल फ्रेंड या पुस्तकावर चित्रपट येत आहे. या चित्रपटात मुख्य भूमिकेत अर्जुन कपूर आणि श्रद्धा कपूर आहेत

Release of first poster of Arjuna-Half Girlfriend poster | अर्जुन-श्रद्धाच्या हाफ गर्लफ्रेंडचे पहिले पोस्टर रिलीज

अर्जुन-श्रद्धाच्या हाफ गर्लफ्रेंडचे पहिले पोस्टर रिलीज

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 14 - बेस्ट सेलर पुस्तकांचे प्रसिद्ध लेखक चेतन भगत यांच्या हाफ गर्ल फ्रेंड या पुस्तकावर चित्रपट येत आहे. या चित्रपटात मुख्य भूमिकेत अर्जुन कपूर आणि श्रद्धा कपूर आहेत. गेल्या वर्षाच्या मध्यंतरी चित्रपटाच्या शुटींगला सुरुवात झाली होती. या चित्रपटाचे पहिले पोस्टर रिलीज करण्यात आले आहे.

अभिनेत्री श्रद्धा कपूर आणि अर्जुन कपूर यांच्या महत्त्वाच्या भूमिका असणाऱ्या हाफ गर्लफ्रेंड या चित्रपटाचे पहिले टिझर पोस्टर रिलीज करण्यात आले आहे. हे पोस्टर  #halfgirlfriend #19thmayअशा हॅशटॅग अंतर्गत प्रदर्शित करण्यात आले आहे. बास्केट बॉल कोर्ट अतिशय लक्षवेधी दिसत असून एनबीए या विश्वविख्यात बास्केटबॉल लीगविषयीची माहिती या पोस्टरवर देण्यात आली आहे. 

चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखही या पोस्टरवर पाहायला मिळत आहे. हा चित्रपट 19 मे ला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटामध्ये अर्जुन कपूर एका सर्वसामान्य बिहारी तरुणाच्या भूमिकेत दिसणार आहे. जो दिल्लीच्या एका श्रीमंत तरुणीच्या (आलियाच्या) प्रेमात पडतो. त्यामुळे आता या दोघांच्या प्रेमाचा बॉल बास्केटमध्ये जाण्यात यश मिळवणार का हे येत्या काळात कळेलच.

 

Web Title: Release of first poster of Arjuna-Half Girlfriend poster