RCB ने सामना जिंकताच कोहलीने सर्वांसमोर केलं फ्लाइंग किस, अनुष्काने खास अंदाजात दिला रिप्लाय

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2025 10:12 IST2025-05-28T10:11:46+5:302025-05-28T10:12:24+5:30

Virat Kohli Flying Kiss Anushka Sharma: RCB ने काल लखनौ सुपर जायंट्सला सहा गडी राखत पराभूत केलं. त्यानंतर विरुष्काची क्यूट प्रतिक्रिया सोशल मीडियावर व्हायरल होत आहे

RCB won the match against lsg virat Kohli gave a flying kiss in front of everyone to Anushka sharma | RCB ने सामना जिंकताच कोहलीने सर्वांसमोर केलं फ्लाइंग किस, अनुष्काने खास अंदाजात दिला रिप्लाय

RCB ने सामना जिंकताच कोहलीने सर्वांसमोर केलं फ्लाइंग किस, अनुष्काने खास अंदाजात दिला रिप्लाय

काल २७ मे २०२५ रोजी लखनऊच्या इकाना स्टेडियमवर झालेल्या IPL 2025 च्या सामन्यात, रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने लखनऊ सुपर जायंट्सवर ६ गडी राखून विजय मिळवला. अशक्यप्राय वाटणारा विजय रॉयल चॅलेंजर्सने खेचून आणला. विराट कोहली आऊट झाल्यावर RCB च्या विजयाच्या आशा जवळपास संपुष्टात आल्या होत्या. परंतु जितेश शर्मा आणि मयांक अग्रवालच्या तुफानी फटकेबाजीने RCB ने ६ गडी राखून LSG वर विजय मिळवला. या विजयानंतर विराट कोहलीने सर्वांसमोर अनुष्काला फ्लाइंग किस केलं. 

विराट कोहली-अनुष्काचं फ्लाइंग किस

RCB चा विजय दृष्टीपथात दिसताच विराट कोहली नाचत नाचतच ग्राऊंडवर येऊन पॅव्हेलियनमध्ये सर्वांसोबत बसला.  RCB ने मॅच जिंकल्यावर विराट कोहलीने स्टँडमध्ये बसलेल्या पत्नी अनुष्का शर्माला फ्लाइंग किस दिला.  या फ्लाइंग किसला अनुष्कानेही खास प्रतिसाद दिला. हा प्रेमळ क्षण सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पुन्हा एकदा विरुष्काचं प्रेम सर्वांना बघायला मिळालं. विराटने टेस्ट मॅचमधून निवृत्ती त्यांच्या संसारात एक निराशा पसरली, अशी चर्चा होती. पण कालच्या RCB च्या विजयामुळे पुन्हा एकदा दोघांना आनंदी पाहून त्यांचे चाहतेही खूश झाले आहेत.

RCB चा क्वालिफायर १ मध्ये प्रवेश

विराटच्या या विजयामुळे RCB ने IPL 2025 च्या क्वालिफायर 1 मध्ये प्रवेश केला. विराटने ३० चेंडूत ५४ धावा करत संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली.  रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या संघाने घरच्या मैदानावर खेळणाऱ्या लखनौ सुपर जाएंट्सला पराभूत करत टॉप २ मधील आपले स्थान पक्के केले. या सामन्यातील निकालानंतर १९ गुणांसह RCB चा संघ गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर पोहचला. पंजाब किंग्जचा संघाच्या खात्यातही १९ गुण आहेत. पण उत्तम धावगतीमुळे पंजाब किंग्जचा संघ टॉपर ठरला. प्लेऑफ्समधील चार संघापैकी अव्वल दोन संघ म्हणजेच LSG आणि RCB पहिल्या क्वॉलिफायरमध्ये थेट फायनल गाठण्यासाठी भिडतील. 

 

Web Title: RCB won the match against lsg virat Kohli gave a flying kiss in front of everyone to Anushka sharma

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.