Rashmika Mandanna: रश्मिका मंदानाचे इन्स्टाग्राम अकाउंट हॅक?; प्रोफाइलमध्ये झाले बदल, चाहत्यांना पडला प्रश्न!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2022 17:12 IST2022-12-12T17:11:03+5:302022-12-12T17:12:48+5:30
नॅशनल क्रश म्हटली जाणारी ही अभिनेत्री अनेकदा कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते.

Rashmika Mandanna: रश्मिका मंदानाचे इन्स्टाग्राम अकाउंट हॅक?; प्रोफाइलमध्ये झाले बदल, चाहत्यांना पडला प्रश्न!
दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदाना तिचे चित्रपट तसेच त्यातील जबरदस्त अभिनयासाठी देशभरात खूप प्रसिद्ध आहे. नॅशनल क्रश म्हटली जाणारी ही अभिनेत्री अनेकदा कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते.
दाक्षिणात्य ते बॉलीवूडपर्यंत आपला ठसा उमटवणारी अभिनेत्री रश्मिका मंदाना हिच्या चाहत्यांचा अंदाज या अभिनेत्रीच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन लावता येतो. अभिनेत्रीचे ३५.५ लाखाहून अधिक फॉलोअर्स आहेत. पण नुकतेच रश्मिका मंदनाचे इन्स्टाग्राम अकाउंट पाहून तिचे अकाउंट हॅक झाल्याचा अंदाज चाहते व्यक्त करत आहेत. रश्मिका मंदानाच्या चाहत्यांच्या लक्षात आले आहे की, तिचे नाव आणि बायो उलटसुलट लिहिलेले आहेत.
रश्मिकाच्या प्रोफाइलमध्ये हा बदल पाहिल्यानंतर चाहत्यांचे म्हणणे आहे की, अभिनेत्री रश्मिकाचे अकाउंट हॅक झाले आहे. दरम्यान रश्मिका मंदानाकडून याबाबत कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र चाहत्यांकडून चिंता व्यक्त करण्यात येत आहे.
दरम्यान, रश्मिका मंदाना 'कांतारा' चित्रपट न पाहिल्यामुळे ट्रोलची शिकार झाली होती. तरीही त्याने ट्रोल्सना चोख प्रत्युत्तर दिले. दुसरीकडे, ती लवकरच 'पुष्पा: द रुल' च्या शूटिंगला सुरुवात करणार आहे, याशिवाय, अलीकडेच ती अलविदा या हिंदी चित्रपटात दिसली होती, जो बॉक्स ऑफिसवर फारसा चालला नाही.