'बेफिक्रे'च्या नव्या गाण्यात रणवीर-वाणीचा बोल्ड अंदाज

By Admin | Updated: November 3, 2016 23:57 IST2016-11-03T23:31:22+5:302016-11-03T23:57:38+5:30

या गाण्याच्या सुरूवातीला वाणी कपूर बोल्ड लूकमध्ये दिसते, तर गाण्याच्या अखेरीस रणवीर आणि वाणी किस करताना दिसत आहेत.

Ranveer-Vani's bold style in the new song 'Baiffre' | 'बेफिक्रे'च्या नव्या गाण्यात रणवीर-वाणीचा बोल्ड अंदाज

'बेफिक्रे'च्या नव्या गाण्यात रणवीर-वाणीचा बोल्ड अंदाज

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 3 - रणवीर सिंग आणि वाणी कपूरचा आगामी चित्रपट बेफिक्रेमधील ‘उड़े दिल बेफिक्रे’ हे नवं गाणं रिलीज झालं आहे. यापूर्वी या चित्रपटातील  ‘नशे सी चढ़ गयी ओये’ हे गाणं रिलीज झालं होतं. ‘उड़े दिल बेफिक्रे’ या गाण्यामध्ये रणवीर आणि वाणीच्या बेफिक्र अदांची झलक पाहायला मिळते. या गाण्याच्या सुरूवातीला वाणी कपूर बोल्ड लूकमध्ये दिसते, तर गाण्याच्या अखेरीस रणवीर आणि वाणी किस करताना दिसत आहेत. यशराज बॅनरच्या या चित्रपटाचं दिग्दर्शन आदित्य चोप्रा करत आहेत. 10 ऑक्टोबरला या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला होता तर 9 डिसेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होत आहे.  

 

 

 

 

 

 

Web Title: Ranveer-Vani's bold style in the new song 'Baiffre'