रणवीर सिंहच्या 'धुरंधर'मध्ये 'ही' अभिनेत्री साकारणार परवीन बाबीची भूमिका, मेकर्सकडून सरप्राईज?
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2025 11:50 IST2025-09-30T11:50:00+5:302025-09-30T11:50:35+5:30
परवीन बाबीच्या भूमिकेत दिसणार 'ही' अभिनेत्री?

रणवीर सिंहच्या 'धुरंधर'मध्ये 'ही' अभिनेत्री साकारणार परवीन बाबीची भूमिका, मेकर्सकडून सरप्राईज?
अभिनेत्री तृप्ती डिमरी 'अॅनिमल' सिनेमामुळे रातोरात लोकप्रिय झाली. रणबीर कपूरसोबत इंटिमेट सीनमुळे तिने लक्ष वेधून घेतलं. तसंच तृप्तीने विकी कौशलसोबत 'बॅड न्यूज'मध्येही बोल्ड सीन केले. यानंतर तृप्तीला अनेक सिनेमांच्या ऑफर्स मिळाल्या. त्यातच एक म्हणजे अभिनेत्री पडद्यावर परवीन बाबी साकारणार असल्याची चर्चा आहे. मात्र हा सिनेमा परवीन बाबीचा बायोपिक नसून एका अन्य सिनेमात ती परवीन बाबीची भूमिका करणार आहे.
एखाद्या सिनेमाची कहाणीच वाटेल असं परवीन बाबीचं आयुष्य होतं. कमालीचं सौंदर्य, दमदार अभिनय मात्र खऱ्या आयुष्यात परवीन बाबी व्यसनाधीन झाली होती. तसंच त्यांना प्रेमभंगालाही सामोरं जावं लागलं होतं. शेवटच्या काळात त्यांना वेड लागलं होतं अशीही चर्चा होती. अशा अभिनेत्रीची भूमिका पडद्यावर साकारण्यासाठी तृ्प्ती डिमरी सज्ज आहे. पिंकव्हिला रिपोर्टनुसार, रणवीर सिंहच्या आगामी 'धुरंधर' सिनेमात तृप्ती डिमरी परवीन बाबीच्या भूमिकेत दिसणार आहे. दिवाळीच्या मुहुर्तावर सिनेमाचे मेकर्स हे बिग सरप्राईज चाहत्यांना देणार आहेत. सिनेमाचं पहिलं गाणं यावेळी रिलीज होणार आहे. या गाण्यात तृप्ती परवीन बाबी साकारणार आहे. याचा अर्थ सिनेमात तृप्ती डिमरीचा कॅमिओ असणार आहे.
धुरंधर सिनेमा स्पाय थ्रिलर असणार आहे. यामध्ये ७०-८० च्या दशकातली कहाणी पाहायला मिळणार आहे. त्या काळात परवीन बाबी आघाडीची अभिनेत्री होती. तिचे अनेक चाहते होते. त्यामुळे सिनेमात तिचा उल्लेख असणार आहे. आता तृप्ती डिमरी परवीन बाबीच्या भूमिकेत कशी दिसेल हे पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे. आदित्य धर दिग्दर्शित 'धुरंधर' सिनेमा ५ डिसेंबर रोजी रिलीज होणार आहे.