ऐश्वर्या बरोबर बोल्ड सीन्समध्ये 'मौके पे चौका' मारला - रणबीर ( फोटो स्टोरी)
By Admin | Updated: October 27, 2016 15:41 IST2016-10-27T13:45:46+5:302016-10-27T15:41:52+5:30
विविध वादांमुळे गाजलेला करण जोहरचा 'ए दिल है मुश्किल' चित्रपट रणबीर कपूर आणि ऐश्वर्या रायमधील हॉट केमिस्ट्रीमुळेही तितकाच चर्चेत आहे.

ऐश्वर्या बरोबर बोल्ड सीन्समध्ये 'मौके पे चौका' मारला - रणबीर ( फोटो स्टोरी)
tyle="text-align: justify;"> ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २७ - विविध वादांमुळे गाजलेला करण जोहरचा 'ए दिल है मुश्किल' चित्रपट रणबीर कपूर आणि ऐश्वर्या रायमधील हॉट केमिस्ट्रीमुळेही तितकाच चर्चेत आहे. बच्चन कुटुंबाची सूनबाई असलेल्या ऐश्वर्याने लग्नानंतर पहिल्यांदाच इतके सेक्स सीन केल्यामुळे चित्रपटाच्या कथानकापेक्षा रणबीर-ऐश्वर्याच्या या सेक्स सीन्सची चर्चा जास्त रंगली आहे.
चित्रपटाच्या प्रमोशनच्या निमित्ताने एका रेडिओ वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत रणबीर ऐश्वर्याबद्दल भरभरुन बोलला. मी नुकतीच दहावीची परिक्षा उर्तीण होऊन बाहेर पडलो होते. 'आ अब लौट चले' या आमच्या घरच्या चित्रपटात ऐश्वर्या हिरॉईन होती. मी या चित्रपटाचा सहदिग्दर्शक होतो. त्यावेळी आमच्या दोघांची मैत्री झाली. मुलीबद्दल त्या वयात तुम्हाला समजायला लागते. मी ऐश्वर्याकडे त्या वयातच आकर्षित झालो होते असे रणबीरने सांगितले.
आणखी वाचा
त्यानंतर रणबीरला चित्रपटातील ऐश्वर्या बरोबरच्या सेक्स सीन्सबद्दल प्रश्न विचारला. त्यावर रणबीरने सुरुवातीला आपली बावरल्यासारखी अवस्था झाल्याचे प्रांजळपणे कबूल केले. ऐश्वर्या बरोबर इंटिमेट सीन करताना मी बावरलो होतो. माझे हात थरथरत होते. ऐश्वर्याच्या गालाला स्पर्श करताना मला संकोचल्यासारखे झाले होते. तेव्हा ऐश्वर्यानेच पुढाकार घेऊन माझा संकोच दूर केला. तुला काय झाले आहे ? सीन व्यवस्थित कर, आपण कलाकार आहोत. त्यानंतर मी सुद्धा पुन्हा अशी संधी मिळणार नाही असा विचार करुन 'मौके पे चौका मार दिया'.