रणबीर कपूरचा हुबेहूब संजय दत्त लूक, ओळखणंही कठीण

By Admin | Updated: April 13, 2017 09:09 IST2017-04-13T09:06:08+5:302017-04-13T09:09:33+5:30

पांढरे केस, वाढलेली मिशी, दाढी आणि भगवा नाम ओढलेल्या या लूकमध्ये रणबीर कपूर हुबेहूब संजय दत्त दिसत आहे

Ranbir Kapoor's debut, Sanjay Dutt Luke, recognizing it too difficult | रणबीर कपूरचा हुबेहूब संजय दत्त लूक, ओळखणंही कठीण

रणबीर कपूरचा हुबेहूब संजय दत्त लूक, ओळखणंही कठीण

>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 13 - आगामी संजय दत्त बायोपिकमध्ये रणबीर कपूर ‘खलनायक’ स्टार संजूबाबाची भूमिका करणार आहे. ‘मुन्नाभाई सिरीज’, ‘३ इडियटस्’, ‘पीके’ फेम दिग्दर्शक राजकुमार हिराणी हा चित्रपट दिग्दर्शित करीत आहेत. या चित्रपटासाठी रणबीर कपूरने प्रचंड मेहनत केली असून संजय दत्तसारखं दिसण्यासाठी त्याचा संपुर्ण मेकओव्हर करण्यात आल्याची चर्चा होती. चित्रपटातील त्याचा नवा लूक समोर आला असून काही फोटो लीक झाले आहेत. नुकत्याच समोर आलेल्या फोटोंमध्ये रणबीर संजय दत्तच्या सध्याच्या लूकमध्ये दिसत आहे. पांढरे केस, वाढलेली मिशी, दाढी आणि भगवा नाम ओढलेल्या या लूकमध्ये रणबीर कपूर हुबेहूब संजय दत्त दिसत आहे. हे फोटो पाहून हा खरंच रणबीर कपूर आहे का असा प्रश्न पडल्याशिवाय राहणार नाही.
 
(संजय दत्तच्या सिनेमात सोनम कपूर साकारणार धक-धक गर्ल माधुरी)
(जेव्हा संजय दत्त करणार होता ऋषी कपूरची पिटाई..!)
(जाणून घ्या माधुरी दीक्षित आणि संजय दत्तच्या प्रेमकथेविषयी...)
 
काही दिवसांपुर्वी चित्रपटाच्या सेटवरील काही फोटो समोर आले होते जे पाहून रणबीर कपूर या भूमिकेसाठी योग्य निवड असल्याचं दिसत होतं. मध्यंतरी संजय दत्त आणि रणबीरमध्ये काही अलबेल नसून संजय दत्त नाराज असल्याच्या बातम्या आल्या होत्या. पण या फोटोंवरुन तरी सध्या ही फक्त चर्चाच होती असं वाटत आहे.
‘दंगल’च्या प्रीमिअरला आलेल्या हिराणींनी पत्रकारांना उत्तर देताना म्हटले की, ‘रणबीर-संजयमध्ये वाद असल्याच्या बातम्या पूर्ण असत्य आहे. दोघांची खूप चांगली मैत्री असून संजय त्याला मदत करण्यासाठी खूप मदत करीत आहे. संजयचा स्वभावच मुळात मिश्किल आणि विनोदी आहे. रणबीरला टाळत असल्याची गोष्ट त्याच्या विनोदाचा एक भाग आहे. त्यामुळे या चर्चा थांबवा.’
 

Web Title: Ranbir Kapoor's debut, Sanjay Dutt Luke, recognizing it too difficult