रणबीर-कतरिनामध्ये झाले ‘आॅल इज वेल’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2016 04:06 IST2016-07-30T04:06:07+5:302016-07-30T04:06:07+5:30

‘ज ग्गा जासूस’ या अनुराग कश्यप दिग्दर्शित चित्रपटाचे शूटिंग शेवटच्या टप्प्यात असून आता रणबीर-कतरिना कैफ यांच्यामध्ये सर्व ‘आॅल इज वेल’ झाल्याचे कळते आहे.

Ranbir Kapoor's 'All Is Well' | रणबीर-कतरिनामध्ये झाले ‘आॅल इज वेल’

रणबीर-कतरिनामध्ये झाले ‘आॅल इज वेल’

‘ज ग्गा जासूस’ या अनुराग कश्यप दिग्दर्शित चित्रपटाचे शूटिंग शेवटच्या टप्प्यात असून आता रणबीर-कतरिना कैफ यांच्यामध्ये सर्व ‘आॅल इज वेल’ झाल्याचे कळते आहे. जेव्हापासून ‘जग्गा जासूस’चे शूटिंग सुरू झाले आहे तेव्हापासून त्यांच्यातील ब्रेकअपमुळे शूटिंगमध्ये अडथळा येत आहे. अनुराग बासू यांना रणबीर-कतरिना यांना एकत्र आणून शूटिंग करून घ्यावी लागत होती. त्यामुळे त्याला शूटिंगसाठी फार वेळ लागायचा. त्यांचा मूड आणि ठिकाणं यांच्यामुळे चित्रीकरणाला उशीर होत गेला. पण, सिद्धार्थ रॉय कपूर यांनी या बातमीला खोटे ठरवले आहे. ते म्हणतात, ‘असे काहीही नाही. ‘जग्गा जासूस’चे शूटिंग सध्या व्यवस्थित सुरू आहे. रणबीर-कतरिना हे प्रोफेशनल्स म्हणून एकमेकांसोबत काम करत आहेत. शूटिंगही व्यवस्थित सुरू आहे. अशा अफवा खूप असतात, पण काहींकडे दुर्लक्ष केलेलेच बरे.’

Web Title: Ranbir Kapoor's 'All Is Well'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.