रमेश-सुरेशवाला फोटो व्हायरल

By Admin | Updated: September 26, 2016 01:48 IST2016-09-26T01:48:12+5:302016-09-26T01:48:12+5:30

कलाकाराला प्रत्येक चित्रपटातल्या भूमिकेनुसार स्वत:मध्ये काही बदल करावे लागतात. प्रेक्षकांनाही आपल्या लाडक्या कलाकारांना सतत वेगवेगळ्या लूक्समध्ये पाहायला आवडते.

Ramesh-Sureshwala photo viral | रमेश-सुरेशवाला फोटो व्हायरल

रमेश-सुरेशवाला फोटो व्हायरल

कलाकाराला प्रत्येक चित्रपटातल्या भूमिकेनुसार स्वत:मध्ये काही बदल करावे लागतात. प्रेक्षकांनाही आपल्या लाडक्या कलाकारांना सतत वेगवेगळ्या लूक्समध्ये पाहायला आवडते. सध्या अभिनेता रितेश देशमुखदेखील एकदम हटके हेअरस्टाईलमध्ये दिसतो आहे. 'बॅन्जो' या चित्रपटासाठी रितेशने केस वाढवले होते. मात्र, आता त्याने हेअरस्टाईल बदलली आहे. रितेशच्या या हेअरस्टाईलची सगळीकडे जोरदार चर्चा आहे. एवढेच काय, तर रितेशची ही हेअरस्टाईल सोशल मीडियावरदेखील हिट होऊ लागली आहे. रितेशने स्वत:च्या फोटोसोबत बकरीचा फोटो जोडून ‘रमेश आणि सुरेश’ अशी नावे देऊन तो ट्विटर अपलोड केला आहे. आता ही हेअरस्टाईल रितेशने आगामी चित्रपटासाठी केली की, सहज हे मात्र अजून कळू शकलेले नाही.

Web Title: Ramesh-Sureshwala photo viral