अंबानींच्या लग्नात वाढपी झालेल्या राखीला मिळालं नाही अनंतच्या लग्नाचं निमंत्रण; अभिनेत्रीने केली आगपाखड
By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2024 01:51 PM2024-03-07T13:51:59+5:302024-03-07T13:52:24+5:30
Rakhi sawant: राखीने एकेकाळी अनिल अंबानी आणि टीना अंबानी यांच्या लग्नात वेट्रेसचं काम केलं होतं. त्यावेळी तिला या कामाचे ५० रुपये मिळाले होते.
सोशल मीडियावर सध्या अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या प्री वेडिंगची जोरदार चर्चा रंगली आहे. देशविदेशातील अनेक दिग्गजांनी या प्री वेडिंग फंक्शनला हजेरी लावल्याचं दिसून येत आहे. यामध्ये कलाविश्वातूनही अनेक दिग्गज सेलिब्रिटी सुद्धा सहभागी झाले आहेत. त्यामुळे सोशल मीडियावर सध्या या सेलिब्रिटींचे अंबानींच्या फंक्शनमधील फोटो, व्हिडीओ व्हायरल होत आहेत. यामध्येच आता राखी सावंत हिची एक पोस्ट चर्चेत आली आहे. राखीने अंबानींवर नाराजी व्यक्त केली आहे.
ड्रामा क्वीन अर्थात राखीने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तिने अंबानींप्रती नाराजी व्यक्त केली आहे. राखीला या प्री वेडिंग फंक्शनमध्ये न बोलावल्यामुळे ती नाराज झाली आहे. तिचा हा व्हिडीओ विरल भयानी यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.
राखीने केली आगपाखड
"राखीला अनंत आणि राधिकाच्या प्री वेडिंगला न बोलावल्यामुळे ती कमालीची नाराज झाली आहे. एका व्हिडीओच्या माध्यमातून तिने तिची नाराजीही व्यक्त केली आहे. नमस्कार अंबानी, तुम्ही मला लग्नाला का बोलावलं नाही? तुम्हाला माहित होतं की, जर मला लग्नाला बोलावलं तर फ्लोअर तोडून टाकला असता, खुर्च्या तोडून टाकल्या असत्या, माझा डान्स तुम्ही अजूनपर्यंत पाहिलाच नाहीये. अंबानी जी तुम्ही प्री वेडिंगला अकॉन, रिहाना यांना बोलावलं. हे सगळे माझ्यासमोर अगदी न्यून आहेत. 'मुन्नी बदनाम हुई', 'टुक टुक देखे', 'परदेसिया ये'..हे माझे डान्स तुम्ही पाहिले नाहीत का? या सगळ्या गाण्यांवर मी डान्स केला आहे", असं राखी म्हणाली.
पुढे ती म्हणते, "तुम्ही मला का बोलावलं नाही ते सांगा. ज्यांना तुम्ही हजार कोटी रुपये देऊन बोलावलं त्यांच्यापेक्षा कितीतरी पटीने माझा डान्स चांगला आहे. रिहाना तर फाटक्या कपड्यांमध्ये आली होती. जर, मी आले असते तर सगळ्यांनी माझी दखल घेतली असती. माझ्या येण्यामुळे तुमचाच फायदा झाला असता तो म्हणजे, एकीकडे मी तुमचं मनोरंजन केलं असतं आणि दुसरीकडे भांडी घासली असती. सगळ्या रुम्स साफ केल्या असत्या. मी सगळं काही केलं असतं. पण तुम्ही हजार कोटी रुपये खर्च करुन कुणाला बोलावलं, तुम्ही काही राखी सावंतला बोलावलं नाही. हे काय केलं तुम्ही?"
दरम्यान, राखीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. अनेकांनी तिला शांत राहण्याचा सल्ला दिला आहे. तर, काहींनी तिची खिल्ली उडवली आहे. राखीने एकेकाळी अनिल अंबानी आणि टीना अंबानी यांच्या लग्नात वेट्रेसचं काम केलं होतं. त्यावेळी तिला या कामाचे ५० रुपये मिळाले होते.