सलमानच्या घराबाहेर गोळीबार झाल्यानंतर राखी सावंतला अश्रू अनावर म्हणाली, "त्याने गरीबांचं भलं केलंय अन्..."

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2024 10:13 AM2024-04-16T10:13:58+5:302024-04-16T10:15:20+5:30

सलमानच्या घराबाहेर गोळीबार झाल्यावर राखी सावंतने भावूक व्हिडीओ पोस्ट केलाय. राखी काय म्हणाली?

Rakhi Sawant came out in support of Salman Khan regarding gunshot outside his house | सलमानच्या घराबाहेर गोळीबार झाल्यानंतर राखी सावंतला अश्रू अनावर म्हणाली, "त्याने गरीबांचं भलं केलंय अन्..."

सलमानच्या घराबाहेर गोळीबार झाल्यानंतर राखी सावंतला अश्रू अनावर म्हणाली, "त्याने गरीबांचं भलं केलंय अन्..."

अभिनेता सलमान खानच्या बांद्रा येथील गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर रविवारी पहाटे गोळीबार झाला. त्यामुळे संपूर्ण देश हादरुन गेला. मुंबई पोलिसांनी धडक कारवाई करत गुजरातमधून सलमानच्या घराबाहेर गोळीबार करणाऱ्या दोन इसमांना ताब्यात घेतलं. सलमानबद्दल अनेक प्रतिक्रिया सोशल मीडियावर समोर येत आहेत. अशातच सलमानची बहिण म्हणवणाऱ्या राखी सावंतने एक व्हिडीओ शेअर करत भावूक प्रतिक्रिया दिली आहे.

गोळीबार प्रकरणाचा तणाव वाढत असताना अभिनेत्री राखी सावंतने पुढे येऊन तिचा भाऊ सलमान खानच्या सुरक्षेची मागणी केली आहे. या व्हिडिओमध्ये राखी सावंत रडताना आणि सलमान खानबद्दल बोलताना दिसत आहे. राखी सावंत म्हणाली,"माझ्या भावासोबत असं करू नका. कृपया मी हात जोडून तुम्हा सर्वांना विनंती करते. तो एक आदर्श उदाहरण आहे सर्वांसाठी. त्याच्यामुळे अनेक लोकांची घरं वाचली आहेत. त्याने अनेक गरीबांचं भलंही केलंय."

राखी सावंत पुढे म्हणते, "मी हात जोडते, तुम्हाला हे करुन काय मिळणार? किती घरं सलमानच्या NGO मुळे चालतात. तो चित्रपटात येतो, गरीबांसाठी पैसे कमावतो, माझ्यासारख्या गरीब लोकांसाठी याशिवाय त्याने माझ्या आईसाठी खूप काही केलं आहे. माझ्या आईचे ऑपरेशन झालं तसंच लाखो लोकांच्या ऑपरेशनची जबाबदारी त्याने स्वीकारली. तो वर्षभर लोकांना मदत करतो, सलमान खान माझा भाऊ आहे आणि मी त्याची बहीण आहे, कृपया असं करू नका." राखीचा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झालाय.

Web Title: Rakhi Sawant came out in support of Salman Khan regarding gunshot outside his house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.