"विराटचे चाहते त्याच्यापेक्षा मोठे जोकर", राहुल वैद्यने कोहलीला मारला टोमणा; नक्की झालं काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2025 10:32 IST2025-05-06T10:32:13+5:302025-05-06T10:32:48+5:30

राहुल वैद्यने पुन्हा कोहलीवर साधला निशाणा, चाहत्यांना म्हणाला, 'दो कौडी के जोकर्स'

rahul vaidya says virat kohli s fans are bigger joker than virat know what happened | "विराटचे चाहते त्याच्यापेक्षा मोठे जोकर", राहुल वैद्यने कोहलीला मारला टोमणा; नक्की झालं काय?

"विराटचे चाहते त्याच्यापेक्षा मोठे जोकर", राहुल वैद्यने कोहलीला मारला टोमणा; नक्की झालं काय?

मराठी, हिंदी गायक राहुल वैद्यने (Rahul Vaidya) क्रिकेटपटू विराट कोहलीबाबत (Virat Kohli) पुन्हा एकदा असं काही बोलला आहे ज्यामुळे तो चर्चेत आला आहे. विराट कोहली दोन दिवसांपूर्वी वेगळ्याच कारणामुळे प्रसिद्धीझोतात आला होता. अभिनेत्री अवनीत कौरच्या फॅन पेजवरील तिचा एक फोटो त्याने लाईक केला. यावर सोशल मीडियावर खूप चर्चा झाली. याचा परिणाम असा की किंग कोहलीला चक्क स्पष्टीकरण द्यावं लागलं. यावरुन आता राहुल वैद्यने पुन्हा कोहलीवर निशाणा साधला आहे. 

काय आहे राहुल वैद्यची पोस्ट?

राहुल वैद्यने इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर करत लिहिले, "विराट कोहलीचे चाहते विराटपेक्षाही जास्त मोठे जोकर आहेत." राहुलच्या या स्टोरीवर टीका झाल्यानंतर त्याने आणखी एक स्टोरी शेअर करत लिहिले, "आता तुम्ही मला दोष देत आहात ते ठीक आहे. पण तुम्ही माझ्या पत्नी आणि बहिणीलावरही टीका करत आहात ज्यांचा याच्याशी काहीच संबंध नाही. तर मी बरोबरच होतो की तुम्ही सगळे विराटचे चाहते जोकर आहात. २ कौडी के जोकर्स."

नक्की प्रकरण काय?

विराट कोहलीने अवनीत कौरच्या फॅन पेजवरील एक फोटो लाईक केला आणि सोशल मीडियावर गदारोळ झाला. अखेर किंग कोहलीने स्पष्टीकरण देत सांगितले की हे इन्स्टाग्रामच्या algorithm मुळे झालं. आयपीएलमध्ये सीएसके विरोधात बंगळुरुनी विजयी कामगिरी केल्यानंतरही कोहलीच्या चेहऱ्यावर काहीच आनंद दिसला नाही. इन्स्टाग्रामवरच्या त्या प्रकारामुळेच कोहली तो निराश झाल्याची आणि आनंद साजरा न केल्याची चर्चा सोशल मीडियावर त्याच्या चाहत्यांनी केली. तर काहींनी अनुष्काचा फोटो घेऊन मीम्सही बनवले. यावरच राहुलने ही प्रतिक्रिया दिली आहे. 

इतकंच नाही राहुलने एक व्हिडिओही शेअर केला होता. तो म्हणाला, "विराट कोहलीने मला ब्लॉक केलंय तुम्हाला माहितच आहे. हा सुद्धा इन्स्टाग्रामच्याच algorithm चा दोष असेल विराटने हे केलं नसेल. algorithm ने विराटला सांगितलं असेल की मी तुझ्या बाजूने राहुल वैद्यला ब्लॉक करतोय."  विराट कोहलीने मला ब्लॉक केल्याचं काही महिन्यांपूर्वी राहुलने सोशल मीडियावर सांगितलं होतं. त्याने तसा पुरावाही दाखवला होता. त्याच गोष्टीवरुन त्याने विराटला हा टोमणा मारला.

विराट कोहलीवर टीका केल्याने आता राहुल वैद्य चांगलाच ट्रोल होत आहे. 'तू कोण', 'आम्ही तुला ओळखत नाही' असं म्हणत त्याची खिल्ली उडवली जात आहे. राहुल वैद्य गायक असून 'इंडियन आयडॉल'मध्ये तो दिसला होता. बिग बॉस १४ मुळेही तो चर्चेत आला होता. यानंतर तो गाजलेल्या 'लाफ्टर शेफ्स' या शोमध्येही दिसला.

Web Title: rahul vaidya says virat kohli s fans are bigger joker than virat know what happened

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.