मिस्ट्री, रोमान्स अन् कॉमेडीचा तडका! 'या' के-ड्रामाची जगभरात क्रेझ, पाहताना क्षणभरही नजर हटणार नाही 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2025 16:58 IST2025-12-27T16:53:37+5:302025-12-27T16:58:35+5:30

ओटीटी धुमाकूळ घालतेय 'ही' कोरिअन वेब सीरिज,IMDb वर आहे ८.२ रेटिंग

queen of tears korean romantic k drama series imdb rating 8.2 trending on ott must watch | मिस्ट्री, रोमान्स अन् कॉमेडीचा तडका! 'या' के-ड्रामाची जगभरात क्रेझ, पाहताना क्षणभरही नजर हटणार नाही 

मिस्ट्री, रोमान्स अन् कॉमेडीचा तडका! 'या' के-ड्रामाची जगभरात क्रेझ, पाहताना क्षणभरही नजर हटणार नाही 

Trending Webseries On Netflix: कोरियन वेब सीरीजची जादू सध्या जगभर पसरलेली आहे. दर महिन्याला प्रेक्षक नवीन आणि मनोरंजक सिरीजची वाट पाहत असतात. दमदार कथानक, सशक्त पात्रे आणि अनपेक्षित वळणांनी परिपूर्ण या कोरिअन सीरिज  तुम्हाला प्रत्येक भागात गुंतवून ठेवतात. अलिकडेच ओटीटीवर एका के-ड्रामाची जोरदार चर्चा रंगली आहे. या १६ भागांच्या सीरिजने रेटिंगमध्ये मोठा रेकॉर्ड केला आहे. या सीरिजचं नाव 'क्वीन ऑफ टीअर्स' असून सध्या ही सीरिज ओटीटी जगात खूपच गाजते आहे.

'क्वीन ऑफ टीअर्स' ही कोरिअन वेब सीरिज आहे. ही सीरिज नेटफ्लिक्सवर मोठ्या प्रमाणात पाहिली जात आहे आणि भारतीय समीक्षक आणि प्रेक्षकांकडून तिला सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. डिजीटल प्लॅटफॉर्मवर स्ट्रीमिंग होत असलेल्या या सीरिजला भारतात चांगलीच पसंती मिळते आहे. ही लोकप्रिय सीरिज २०२४ मध्ये प्रदर्शित झाली. या सीरिजला IMDb वर ८.२ चे रेटिंग मिळाले आहे. किम सू ह्यून आणि किम जी वोन या कोरिअन कलाकारांची यात मुख्य भूमिका आहे. 

कथानक 

'क्वीन ऑफ टीअर्स' मधील ही कथा बेक ह्यून-वू आणि हाँग हे-इन या विवाहित जोडप्याबद्दल आहे. जरी दिसायला त्यांचं नातं परिपूर्ण असलं तरीही, पण ते तुटण्याच्या मार्गावर असतं.लग्नानंतर काहीच वर्षांत दोघांमध्ये दुरावा निर्माण होतो. मात्र, जेव्हा प्रकरण घटस्फोटापर्यंत पोहोचतं तेव्हा कथेत एक नवीन वळण येतं. भावनिक कथानकासोबतच, यात काही मजेशीर सीन्सही आहेत जे खळखळून हसवतात. ही लोकप्रिय सीरिज पाहताना अगदी क्षणभरही तुमची नजर स्क्रिनवरून हटणार नाही.

Web Title : रहस्य, रोमांस, कॉमेडी: 'क्वीन ऑफ टीयर्स' के-ड्रामा ने दुनियाभर में मचाई धूम!

Web Summary : नेटफ्लिक्स पर कोरियन ड्रामा 'क्वीन ऑफ टीयर्स' दुनियाभर में लोकप्रिय हो रहा है। यह श्रृंखला एक विवाहित जोड़े के बारे में है, जिसमें अप्रत्याशित मोड़ और हास्य है जो दर्शकों को बांधे रखता है। आईएमडीबी पर 8.2 रेटिंग के साथ, यह अवश्य देखने लायक है।

Web Title : Mystery, romance, comedy: 'Queen of Tears' K-drama captivating global audiences.

Web Summary : The Korean drama 'Queen of Tears' on Netflix is gaining popularity worldwide. This series revolves around a married couple, with unexpected twists and humor that keeps viewers hooked. With an IMDb rating of 8.2, it's a must-watch.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.