प्रियांका चोप्रा बनणार नाही संजय लीला भंसालींच्या 'गुस्ताखियाँ'ची सहनिर्माती
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2017 16:39 IST2017-07-18T10:30:19+5:302017-07-18T16:39:39+5:30
प्रियांका चोप्रा लवकरच संजय लीला भंसाली यांचा आगामी चित्रपट गुस्ताखियाँवर काम सुरु करणार आहे. या चित्रपटाला घेऊन सध्या सगळीकडे ...

प्रियांका चोप्रा बनणार नाही संजय लीला भंसालींच्या 'गुस्ताखियाँ'ची सहनिर्माती
प रियांका चोप्रा लवकरच संजय लीला भंसाली यांचा आगामी चित्रपट गुस्ताखियाँवर काम सुरु करणार आहे. या चित्रपटाला घेऊन सध्या सगळीकडे चर्चा आहे. मात्र आता असे कळतेय की ती या चित्रपटाची को-प्रोड्यूसर सुद्धा असणार आहे. मात्र या चित्रपटाशी संबंधीत सूत्रांच्या माहितीनुसार या गोष्टीत काहीच तथ्य नाही. प्रियांका ही फक्त या चित्रपटात काम करते आहे. तिचा चित्रपटाच्या निर्मितीशी काहीही संबंध नाही. हे अजून कळलेले नाही की या चित्रपटाचे शूटिंग ती कधी सुरु करणार आहे. कारण सध्या तिने हॉलिवूडमधले दोन चित्रपट साइन केले आहेत. ज्यांच्या शूटिंगमध्ये ती 2018पर्यंत व्यस्त असणार आहे. जर प्रियांका चोप्रा एवढा दीर्घकाळ त्या हॉलिवूडमध्ये व्यस्त राहिली तर कदाचित संजय लीला भंसाली या चित्रपटासाठी दुसऱ्या अभिनेत्रीला साइन करण्याची शक्यता आहे. त्याच बरोबर प्रियांका क्वांटिकोच्या तिसऱ्या सीजनमध्ये देखील झळकणार आहे. त्यामुळे संजय लीला भंसाली यांना दिलेल्या डेट्समध्ये ती हॉलिवूडमध्ये बिझी असणार आहे. काही दिवसांआधी अशी खबर आली होती की चित्रपटाला उशीर होतोय या कारणामुळे इरफान खानने या चित्रपटात काम करण्यास नकार दिला आहे. मात्र इरफानने असे काही घडल्याचे आपल्याला काहीत माहित नसल्याचे त्यांनी सांगितले आहे. हा चित्रपट बॉलिवूडचे गाजलेले गीतकार, कवी साहिर लुधियानवी यांच्या आयुष्यावर आधारित हा चित्रपट आहे. लुधियानवी हे शेवटपर्यंत अविवाहित राहिले. लेखिका व कवयित्री अमृता प्रीतम आणि गायिका तसेच अभिनेत्री सुधा मल्होत्रा यांच्यासोबतचे साहिर यांचे रिलेशनशिप बरेच चर्चेत राहिले.