...म्हणून प्रियांका चोप्राने मोदींना भेटायला जाताना घातला शॉर्ट ड्रेस

By Admin | Updated: July 6, 2017 10:43 IST2017-07-06T10:41:32+5:302017-07-06T10:43:21+5:30

बर्लिनमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेताना अभिनेत्री प्रियांका चोप्राने परिधान केलेल्या पोशाखावरुन सोशल नेटवर्किंग साईटसवर प्रियांकाला चांगलेच फैलावर घेण्यात आले होते

... as Priyanka Chopra put on short while going to meet Modi | ...म्हणून प्रियांका चोप्राने मोदींना भेटायला जाताना घातला शॉर्ट ड्रेस

...म्हणून प्रियांका चोप्राने मोदींना भेटायला जाताना घातला शॉर्ट ड्रेस

>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 6 - बर्लिनमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेताना अभिनेत्री प्रियांका चोप्राने परिधान केलेल्या पोशाखावरुन सोशल नेटवर्किंग साईटसवर प्रियांकाला चांगलेच फैलावर घेण्यात आले होते. प्रियांकाने मोदींची भेट घेताना पांढ-या रंगाचा वनपीस घातला होता. मात्र हाच तिचा ड्रेन अनेकांना खटकला. प्रियांका तू देशाच्या पंतप्रधानांसमोर बसली होतीस तेव्हा कसे कपडे घालायचे याचे तुला तारतम्य असले पाहिजे असे एका युझरने तिला सुनावले. अनेकांनी प्रियांकाला तिच्या पोषाखावरुन ट्रोल केले होते. प्रियांका चोप्राच्या आईने नुकतंच एका मुलाखतीत प्रियांका चोप्राने शॉर्ट ड्रेस का घातला होता यावर स्पष्टीकरण दिलं आहे. 
 
आणखी वाचा - 
प्रियांकाने पुन्हा शॉर्ट ड्रेस घालून ट्रोलला दिले उत्तर
तुझा झगा गं वा-यावरती उडतो, मेट गाला 2017मध्ये प्रियंका चोप्राचीच चर्चा
प्रियंका चोप्रावर आसाम सरकारने उडवले 3.37 कोटी
 
प्रियांका चोप्राची आई मधु चोप्रा यांनी सांगितलं आहे की, "प्रियांका त्यावेळी बेवॉच चित्रपटाच्या प्रमोशनसाठी बर्लिनमध्ये आली होती. अशावेळी जेव्हा तिला पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटण्याची संधी मिळाली तेव्हा ती लगेच पोहोचली. अचानक झालेली भेट असल्याने प्रियांकाला कपडे बदलण्यासाठी वेळ नाही मिळाला". 
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यावेळी चार देशांच्या दौ-यावर गेले होते. आपल्या या दौ-यावेळी जेव्हा नरेंद्र मोदी जर्मनीत पोहोचले, तेव्हा तिथे त्यांची आणि प्रियांका चोप्राची भेट झाली. 
 
पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतल्यानंतर प्रियांका चोप्राने चाहत्यांसाठी फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. बर्लिनमध्ये मी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी असण्याचा सुंदर योगायोग जुळून आला. तुमच्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून मला आज सकाळी भेटल्याबद्दल तुमचे खूप आभार", असे ट्विट अभिनेत्री प्रियांका चोप्राने या भेटीनंतर केले होते. 
 
मात्र आपल्या टोंवरुन चाहते आणि युजर्स ट्रोल करतील याची कल्पना प्रियांका चोप्राला नव्हती. देशाच्या पंतप्रधानांना भेटताना प्रियांका चोप्राने असे कपडे घालायला नको होते असा निष्कर्ष काहीजणांनी काढला होता. 
 
सोशल मीडियावर ट्रोलिंगला सुरुवात झाल्यानंतर प्रियांकाने तिच्या आईसोबतचा एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअरकरुन उत्तर दिले होते. या फोटोमध्ये प्रियांका आणि तिची आई दोघीही शॉर्ट ड्रेसमध्ये होत्या. 
 
बेवॉच या सिनेमातून अभिनेत्री प्रियांका चोप्रा हॉलिवूडमध्ये पदार्पण केले. 2 जून रोजी हा सिनेमा भारतात प्रदर्शित झाला. खरंतर बेवॉच या सिनेमाला सिने समिक्षकांनी चांगले रिव्ह्यू दिले नाही पण सिनेमातील प्रियांकाच्या कामाचं कौतुक झालं. 

Web Title: ... as Priyanka Chopra put on short while going to meet Modi