प्रिया म्हणते, ‘फॅमिली टाइम इज बेस्ट’

By Admin | Updated: September 26, 2016 01:46 IST2016-09-26T01:46:39+5:302016-09-26T01:46:39+5:30

अभिनेत्री प्रिया मराठे ही मालिकांनंतर आता वळली आहे चित्रपटांकडे. प्रिया सध्या तिच्या चित्रपटांच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.

Priya says, 'Family time is the best' | प्रिया म्हणते, ‘फॅमिली टाइम इज बेस्ट’

प्रिया म्हणते, ‘फॅमिली टाइम इज बेस्ट’

अभिनेत्री प्रिया मराठे ही मालिकांनंतर आता वळली आहे चित्रपटांकडे. प्रिया सध्या तिच्या चित्रपटांच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. तिने तिच्या बिझी शेड्युलमधील काही वेळ कुटुंबासाठी राखून ठेवला आहे. नुकताच प्रियाने तिच्या बहिणीच्या वाढदिवसाचे फोटो सोशल मीडियावर अपलोड केले आहेत. कुटुंबाला वेळ देणे सगळ्यात महत्त्वाचे असल्याचे प्रियाने ‘लोकमत सीएनएक्स’शी बोलताना सांगितले आहे. आपल्या जवळच्या व्यक्तींच्या आनंदासाठी काही वेळ काढणे गरजेचे असल्याचे तिचे म्हणणे आहे. कुटुंबासोबतचे काही क्षण असे असतात, जे तुम्ही कधीच मिस करू शकत नाही, हे ही सांगायला प्रिया विसरलेली नाही. त्यामुळे मी चित्रीकरणातून थोडा वेळ काढून भावंडांसोबत खूप धमाल केल्याचे प्रियाने सांगितले आहे.

Web Title: Priya says, 'Family time is the best'