बार बार देखोच्या समर्थनासाठी प्रिया मलिक झाली 'ब्रा लेस'

By Admin | Updated: August 30, 2016 13:07 IST2016-08-30T13:07:40+5:302016-08-30T13:07:40+5:30

बिग बॉस ९ मधून चर्चेत आलेली अभिनेत्री प्रिया मलिकने 'ब्रा लेस' होऊन सेन्सॉर बोर्डाच्या निर्णयाचा निषेध केला आहे.

Priya Malik goes back to support the look of 'Bra Lace' | बार बार देखोच्या समर्थनासाठी प्रिया मलिक झाली 'ब्रा लेस'

बार बार देखोच्या समर्थनासाठी प्रिया मलिक झाली 'ब्रा लेस'

tyle="text-align: justify;">ऑनलाइन लोकमत 
मुंबई, दि. ३० - बिग बॉस ९ मधून चर्चेत आलेली अभिनेत्री प्रिया मलिकने 'ब्रा लेस' होऊन सेन्सॉर बोर्डाच्या निर्णयाचा निषेध केला आहे. सेन्सॉर बोर्डाने नुकताच कॅटरीना कैफ आणि सिद्धार्थ मल्होत्राची मुख्य भूमिका असलेल्या 'बार बार देखो' चित्रपटातील ब्रेसियरच्या दृश्यावर आक्षेप घेतला. 
 
सेन्सॉरने ब्रेसियरच्या दृश्याबरोबर सेक्स कॉमिकमधील 'सविता भाभी' या पात्राचा उल्लेख काढून टाकण्याचाही आदेश दिला. प्रियाने स्वत: ब्रा लेस होऊन सोशल मिडियावर सेन्सॉरच्या या निर्णयाचा निषेध केला आहे. 
 
चित्रपटाच्या समर्थनार्थ ब्रा लेस ड्रेस परिधान करुन तिने तिचे फोटो इन्स्टाग्रामवर टाकले आहेत. अलीकडच्या काळातील सेन्सॉरचे काही निर्णय वादग्रस्त ठरले होते. 

Web Title: Priya Malik goes back to support the look of 'Bra Lace'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.