प्रिया आणि सईला आईने दिला सल्ला

By Admin | Updated: October 30, 2016 01:29 IST2016-10-30T01:29:55+5:302016-10-30T01:29:55+5:30

वजन वाढले, की आजच्या मुलींना आपण कधी एकदा जिममध्ये जाऊन वर्कआऊट करतोय आणि झिरो साईज होतोय असेच वाटते. त्यातही अभिनेत्री म्हटले, की मग तर काही विचारूच नका.

Priya and Sai mother gave advice | प्रिया आणि सईला आईने दिला सल्ला

प्रिया आणि सईला आईने दिला सल्ला

वजन वाढले, की आजच्या मुलींना आपण कधी एकदा जिममध्ये जाऊन वर्कआऊट करतोय आणि झिरो साईज होतोय असेच वाटते. त्यातही अभिनेत्री म्हटले, की मग तर काही विचारूच नका. आता हेच पाहा ना वजनदार या चित्रपटासाठी अभिनेत्री प्रिया बापट आणि सई ताम्हणकर या दोघींनीही वजन वाढवले होते. नेहमी डाएटवर असणाऱ्या, मोजून मापून खाणाऱ्या या अभिनेत्री मात्र वजनदारसाठी वजन वाढवताना मस्त गोड-मसालेदार पदार्थांवर ताव मारत होत्या. भरपूर खात होत्या. आपली लाडकी लेक रोज मस्त जेवण करतेय, याचा सर्वात जास्त आनंद प्रिया आणि सईच्या आईलाच झाला. सईच्या आईने तर तिचे वजन छान वाढले म्हणून दिग्दर्शक सचिन कुंडलकर यांना गिफ्ट्स पाठवले, तर प्रियाची आई तिला म्हणाली, तू अशी वजन वाढलेल्या अवस्थेत जास्त छान दिसते आहेस. त्यामुळे
बिलकूलच वजन कमी करू नकोस. आता जशी आहेस तशीच राहा. आमच्या पोरी छान खात-पीत आहेत, याचाच आनंद आमच्या दोघींच्या आईला झाला असल्याचे प्रिया आणि सईने सांगितले.

Web Title: Priya and Sai mother gave advice