प्रीती झिंटाची झोप उडाली?

By Admin | Updated: June 18, 2017 02:40 IST2017-06-18T02:40:19+5:302017-06-18T02:40:19+5:30

प्रीती झिंटा सध्या संसारात रमली असली तरी बरीच चिंतेत आहे. स्वत:शी निगडित अनेक सिक्रेट जगापुढे आलीत. तर या भीतीने प्रीतीला घेरले आहे.

Preity Zinta lost sleep? | प्रीती झिंटाची झोप उडाली?

प्रीती झिंटाची झोप उडाली?

प्रीती झिंटा सध्या संसारात रमली असली तरी बरीच चिंतेत आहे. स्वत:शी निगडित अनेक सिक्रेट जगापुढे आलीत. तर या भीतीने प्रीतीला घेरले आहे. एका वेब सीरिजने प्रीतीची रात्रीची झोप उडवली आहे. अभिनेता, गायक, दिग्दर्शक आणि लेखक फरहान अख्तर यासाठी जबाबदार आहे. त्याचे असे आहे की, फरहान एक वेब सीरिज घेऊन येतो आहे. ही वेब सीरिज आयपीएलवर आधारित आहे. या सीरिजमुळे प्रीती चिंतेत आहे. इतकी की, फरहानला फोन करून, या वेब सीरिजमध्ये तू काय दाखवणार आहेस, हे विचारण्याची गरज प्रीतीला वाटली. ‘एनसाईड एज’ असे या वेब सीरिजचे नाव आहे. येत्या जुलैमध्ये यू ट्यूब चॅनलच्या प्राईम व्हिडिओवर ती प्रसारित होणार आहे. चर्चा खरी मानाल तर फरहानची ही वेब सीरिज प्रीतीच्या आयुष्यावर आधारित असल्याचे मानले जात आहे. यात फाउंडरसोबतचे सेक्स सीन्स असल्याचे समजतेय. असे असेल तर यात प्रीतीच्या आयुष्यातील अनेक रहस्ये जगापुढे येण्याची शक्यता आहे. प्रीतीला असे व्हायला नकोय. आयुष्यातील काही सिक्रेट सिक्रेटच राहावी, असे तिला वाटतेय. त्यामुळे तिने फरहानला फोन करून, ही वेब सीरिज रिलीज होण्याआधी तिला दाखवली जावी, अशी गळ घातली असल्याचे कळतेय.

Web Title: Preity Zinta lost sleep?