प्रसून जोशी? कोण आहेत ते? गुगल करावं लागेल - सनी लिऑन

By Admin | Updated: January 28, 2016 12:54 IST2016-01-28T12:54:43+5:302016-01-28T12:54:43+5:30

प्रसून जोशी? कोण आहेत ते? असं विचारत मला जरा गुगलवर सर्च देऊन बघावं लागेल असं एकदम हटके उत्तर दिलंय सनी लिऑननं

Prasoon Joshi? Who are they? Google has to do - Sunny Leone | प्रसून जोशी? कोण आहेत ते? गुगल करावं लागेल - सनी लिऑन

प्रसून जोशी? कोण आहेत ते? गुगल करावं लागेल - सनी लिऑन

>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २८ - प्रसून जोशी? कोण आहेत ते? असं विचारत मला जरा गुगलवर सर्च देऊन बघावं लागेल असं एकदम हटके उत्तर दिलंय सनी लिऑननं. प्रख्यात गीतकार प्रसून जोशींनी एका मुलाखतीत सनीचा भूतकाळ तिचं काम मान्य नसल्याचं मत व्यक्त केलं होतं. तसेच तिच्यापासून तरूण वर्गाने प्रेरणा घेऊ नये असा सल्लाही प्रसून जोशींनी दिला होता.
इंडियन एक्स्प्रेसच्या प्रतिनिधीने सनी लिऑनला प्रसून जोशींनी केलेल्या टीकेवर प्रतिक्रिया विचारली होती. त्यावेळी सनीने कोण प्रसून जोशी, मी नाही ओळखत असं सांगत प्रतिक्रिया देणं टाळलं. आधी मला गुगल करून दे, मगच मी काही सांगू शकेन असंही तिनं पुढं म्हटलं आहे.
सनी लिऑनचा भूतकाळ काही तिचा पिछा सोडत नाहीये. एका इंटरव्ह्यूमध्ये मुलाखतकाराने अत्यंत हीन पातळीवर तिचा भूतकाळ काढला. जवळपास प्रत्येक मुलाखतीत तिच्या पॉर्न क्षेत्रातल्या करीअरचा हमखास उल्लेख होतोच. आमीर खानने सनीसोबत काम करण्यास काहीच हरकत नसल्याचे म्हटले पण त्याच कार्यक्रमात प्रसून जोशींना तिचा भूतकाळ खटकला.
 
एवढं सगळं असलं तरी सनी लिऑन मात्र या सगळ्याला तोंड देताना, विरोधकांवर टीका करण्याचं टाळत, सौम्य उत्तर देताना दिसत आहे. आत्ताही प्रसून जोशी कोणते माहीत नसल्याचं सांगत, त्यांची माहिती घेते व बोलते असं मार्मिक उत्तर तिनं दिलं आहे.

Web Title: Prasoon Joshi? Who are they? Google has to do - Sunny Leone