प्राजक्ती देशमुख यांनी या कारणामुळे सोडले अभिनयक्षेत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2017 17:48 IST2017-07-12T12:18:22+5:302017-07-12T17:48:22+5:30

सैलाब, थोडा है थोडी की जरुरत है यांसारख्या मालिकांमध्ये प्रमुख भूमिका साकारणाऱ्या प्राजक्ती देशमुख गेल्या अनेक वर्षांपासून अभिनयाक्षेत्रापासून दूर ...

Prajakti Deshmukh left for acting because of this reason | प्राजक्ती देशमुख यांनी या कारणामुळे सोडले अभिनयक्षेत्र

प्राजक्ती देशमुख यांनी या कारणामुळे सोडले अभिनयक्षेत्र

लाब, थोडा है थोडी की जरुरत है यांसारख्या मालिकांमध्ये प्रमुख भूमिका साकारणाऱ्या प्राजक्ती देशमुख गेल्या अनेक वर्षांपासून अभिनयाक्षेत्रापासून दूर आहेत. प्राजक्ती सध्या आर्ट ऑफ लिव्हिंगच्या माध्यमातून लोकांना मेडिटेशन आणि योगाचे धडे देत आहेत. त्यांच्या या नव्या इनिंगबाबत त्यांच्याशी मारलेल्या गप्पा...

प्राजक्ती तुमच्या अनेक मालिका गाजल्या होत्या. तरीही यशाच्या शिखरावर असताना तुम्ही हे क्षेत्र सोडले, याचे काही कारण होते का?
अनेक वर्षं काम केल्यानंतर आपण हे कशासाठी करत आहोत. हे सगळे व्यर्थ आहे याची मला जाणीव व्हायला लागली होती. अभिनयक्षेत्रात असतानाच मी आर्ट ऑफ लिव्हिंगकडे वळली गेली. त्यांचे अनेक कोर्सेस मी केले आणि त्यानंतर माझे जीवन याच कार्यासाठी वाहून देण्याचे मी ठरवले.

अभिनेत्री बनण्याचे तुम्ही आधीच ठरवले होते का?
मी अनेक वर्षं कथ्थक शिकत होते. त्यानंतर मी अभिनयक्षेत्राकडे वळले. प्रत्येकाच्या शरीरात अभिनयाचा किडा असतो असे मला वाटते. त्याप्रमाणे तो माझ्यात देखील होता. त्यामुळे मी या क्षेत्रात करियर करण्याचे ठरवले. सुरुवातीच्या काळात काही जाहिराती केल्या. त्यानंतर मृग्नयनी हा कार्यक्रम केला. तसेच काही नाटकांमध्ये काम केले. सैलाब, थोडा है थोडे की जरुरत है या माझ्या मालिका तर खूपच गाजल्या होत्या. मी अभिनयासोबतच काही मालिकांची निर्मितीदेखील केली होती. 

आजच्या मालिका आणि नव्वदीच्या दशकातील मालिका यांमध्ये तुम्हाला काय फरक जाणवतो?
आज सगळ्याच गोष्टी बदलल्या आहेत. मालिका पूर्वी आठवड्यातून एकदा असायच्या. त्यामुळे आम्हालादेखील चित्रीकरण करायला खूप जास्त वेळ मिळायचा. त्यावेळी गुणवत्तेवर अधिक भर दिला जात असे. आज क्वालिटी नाही तर कॉन्टीटी महत्त्वाची झाली आहे. सध्याचे डेली सोपचे टाइमटेबल पाहाता दिवसातील अनेक तास आणि महिन्यातील अनेक दिवस कलाकार आपल्या कामासाठी देत आहेत. नव्वदीच्या दशकात महिन्यातील काही दिवसच आम्ही काम करायचो. 

तुम्ही काही वर्षं परदेशातदेखील होता, तेथील तुमचा अनुभव कसा होता?
मी काही वर्षं इंडोनेशियात राहिले. तिथे आर्ट ऑफ लिव्हिंगचे कोर्सेस मी लोकांना देत होते. त्यांना योगा देखील शिकवत होते. 2016मध्ये इंटरनॅशनल योगा डे च्या निमित्ताने मी इंडोनेशियातील सुरबाया येथे लोकांना योगा शिकवला आहे. ते मुस्लिम राष्ट्र असूनही मोठ्या संख्येने लोक योगा करायला आले होते.

Web Title: Prajakti Deshmukh left for acting because of this reason

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.