प्रार्थनाने केली सोनालीची प्रशंसा

By Admin | Updated: August 25, 2016 02:25 IST2016-08-25T02:25:16+5:302016-08-25T02:25:16+5:30

दोन अभिनेत्री एकमेकींच्या मैत्रिणी कधीच असू शकत नाहीत असे म्हटले जाते.

Praise Sonali for praying | प्रार्थनाने केली सोनालीची प्रशंसा

प्रार्थनाने केली सोनालीची प्रशंसा


दोन अभिनेत्री एकमेकींच्या मैत्रिणी कधीच असू शकत नाहीत असे म्हटले जाते. पण मराठी इंडस्ट्रीमध्ये अनेक तारका या एकमेकींच्या खूप चांगल्या मैत्रिणी आहेत. ‘मितवा’ या चित्रपटामध्ये सोनाली कुलकर्णी आणि प्रार्थना बहेरे आपल्याला एकत्र दिसल्या होत्या. या चित्रपटानंतर त्या खऱ्या आयुष्यात खूप चांगल्या मैत्रिणी झाल्या आहेत.
नुकतेच प्रार्थना बहेरेने सोशल नेटवर्किंग साईटवर सोनालीचे तोंडभरून कौतुक केले आहे. प्रार्थनाला सोनालीचे व्यक्तिमत्त्व फार आवडते आणि सोनालीच्या यशाचे रहस्य तिचे व्यक्तिमत्वच असल्याचे तिने सोशल नेटवर्किंग साईटवर म्हटले आहे. आपल्या स्पर्धक अभिनेत्रीचे सोशल नेटवर्किंग साईटवर कौतुक करायला खूप मोठे मन लागते.

Web Title: Praise Sonali for praying