प्रभुदेवाला एकताची साथ

By Admin | Updated: September 12, 2014 23:36 IST2014-09-12T23:36:39+5:302014-09-12T23:36:39+5:30

बॉलीवूडचा प्रसिद्ध दिग्दर्शक प्रभुदेवा आता एकता कपूरच्या बॅनरसाठी चित्रपटांचे दिग्दर्शन करणार आहे

Prabhu devalike together with | प्रभुदेवाला एकताची साथ

प्रभुदेवाला एकताची साथ

बॉलीवूडचा प्रसिद्ध दिग्दर्शक प्रभुदेवा आता एकता कपूरच्या बॅनरसाठी चित्रपटांचे दिग्दर्शन करणार आहे. वाँटेड आणि रावडी राठोडसारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटांचे दिग्दर्शन केल्यानंतर प्रभुदेवा सध्या अजय देवगणसोबत अ‍ॅक्शन जॅक्सन या चित्रपटाचे शूटिंग करतो आहे. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर प्रभुदेवा एकताच्या चित्रपटाचे दिग्दर्शन करण्याची शक्यता आहे. या चित्रपटात नव्या कलाकारांना संधी दिली जाणार आहे. तरुणांवर आधारित हा एक थ्रिलर चित्रपट असल्याचे सांगण्यात येत आहे. चित्रपटासाठी अद्याप कलाकारांची निवड करण्यात आलेली नाही. चित्रपटाचे शूटिंग जुलै २०१५ पासून सुरू होणार आहे.

Web Title: Prabhu devalike together with