प्रभास आणि सैफ अली खानच्या मेगा बजेट 'आदिपुरुष'ची रिलीज डेट आली समोर, यादिवशी होणार रिलीज

By गीतांजली | Updated: November 19, 2020 11:46 IST2020-11-19T11:10:41+5:302020-11-19T11:46:15+5:30

अभिनेता प्रभासचा आगामी  सिनेमा ‘आदिपुरुष’ बर्‍याच दिवसांपासून चर्चेत आहे.

Prabhas and saif ali khan starrer adipurush release date announces | प्रभास आणि सैफ अली खानच्या मेगा बजेट 'आदिपुरुष'ची रिलीज डेट आली समोर, यादिवशी होणार रिलीज

प्रभास आणि सैफ अली खानच्या मेगा बजेट 'आदिपुरुष'ची रिलीज डेट आली समोर, यादिवशी होणार रिलीज

अभिनेता प्रभासचा आगामी  सिनेमा ‘आदिपुरुष’ बर्‍याच दिवसांपासून चर्चेत आहे. या सिनेमाची रिलीज डेटही समोर आली आहे. दिग्दर्शक ओम राऊतने 'आदिपुरुष' चित्रपटाची रिलीज डेट जाहिर केली आहे.

प्रभास स्टारर फिल्म 'आदिपुरुष' च्या रिलीज डेटच्या घोषणी ओम राऊतने ट्विटरवरुन केली आहे. ट्विट करताना ओम राऊतने लिहिले, 'आदिपुरुष' 11 ऑगस्ट 2022 ला सिनेमागृहात रिलीज होणार आहे. 

प्रभास आणि ओम राऊतचा हा सिनेमाचा बजेट खूपच जास्त असल्याची चर्चा आहे. पिंकविला रिपोर्टनुसार 'आदिपुरुष'चा एकूण बजेट 350 ते 400 कोटींचा आहे. पौराणिक कथा रामायण यावर हा सिनेमा आधारित आहे. यामध्ये भगवान रामाची भूमिका प्रभास साकारताना दिसणार आहे.

भूमिकेसाठी खास तयारी 
बाहुबली सिनेमात प्रभास एक योद्धा म्हणून समोर आला होता. पण ‘आदिपुरूष’मध्ये त्याची भूमिका थोडी वेगळी आहे. या सिनेमात त्याला एक योद्धा कमी आणि धनुर्धर अधिक दिसायचं आहे. यासाठी प्रभासने एक्सपर्टसोबत बोलणी केली आहे. त्याने शरीरावर कामही सुरू केलंय. काही दिवसात प्रभास धनुर्विद्याही शिकणार आहे. ओम राऊत यांच्या तान्हाजी सिनेमात सैफ अली खानने उदयभानची भूमिका साकारली होती. त्यानंतर आता पुन्हा लंकेशच्या भूमिकेतून सैफ अली खान ‘आदिपुरुष’मध्ये प्रेक्षकांना दिसणार आहे.टी सीरीजच्या बॅनरखाली भूषण कुमार आणि कृष्ण कुमार या सिनेमाची निर्मिती करत आहे.

Web Title: Prabhas and saif ali khan starrer adipurush release date announces