आमीर खानच्या 'दंगल'चं पोस्टर रिलीज

By Admin | Updated: July 4, 2016 13:37 IST2016-07-04T13:26:22+5:302016-07-04T13:37:13+5:30

आमीर खानचा यावर्षीचा बहुप्रतिक्षित चित्रपट 'दंगल'चं पोस्टर रिलीज करण्यात आलं आहे. या पोस्टरमध्ये आमीर खान चित्रपटातील आपल्या चार मुलींसोबत दिसत आहे

Poster Release of Aamir Khan's 'Dangle' | आमीर खानच्या 'दंगल'चं पोस्टर रिलीज

आमीर खानच्या 'दंगल'चं पोस्टर रिलीज

>ऑनलाइन लोकमत - 
मुंबई, दि. 04 - आमीर खानचा यावर्षीचा बहुप्रतिक्षित चित्रपट 'दंगल'चं पोस्टर रिलीज करण्यात आलं आहे. या पोस्टरमध्ये आमीर खान चित्रपटातील आपल्या चार मुलींसोबत दिसत आहे.  म्हारी छोरियाँ छोरों से कम हैं के? असंदेखील या पोस्टरवर लिहिण्यात आलं आहे. स्वत: आमीर खानने त्याच्या ट्विटर अकाऊंटवरुन हे पोस्टर शेअर केलं आहे. काही दिवसांपुर्वी आमीर खानने आपला रावडी लूकदेखील शेअर केला होता. ज्यामधील त्याची शरिरयष्टी पाहून घेतलेली मेहनत दिसत होती.
 
या चित्रपटात आमीर खान सुप्रसिद्ध कुस्तीपटू महावीर फोगट यांची भुमिका साकारत आहे.  कुस्तीपटू महावीर फोगट यांच्या आयुष्यावर आधारित ‘दंगल’ चित्रपट 23 डिसेंबरला नाताळच्या मुहूर्तावर रिलीज करण्यात येणार आहे.
 
(आमीर खानने शेअर केला 'दंगल'मधील रावडी लूक)
 
या चित्रपटात महावीर फोगट यांनी आपल्या दोन मुली, गीता आणि बबिता कुमारी यांना कशाप्रकारे प्रशिक्षण दिले, ही कथा मांडण्यात आली आहे.
 

Web Title: Poster Release of Aamir Khan's 'Dangle'