लोकप्रियतेत कपिलची ‘सुल्तान’ला धोबीपछाड !

By Admin | Updated: July 14, 2016 01:12 IST2016-07-14T01:12:46+5:302016-07-14T01:12:46+5:30

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कलाकार होण्याचा मान कॉमेडियन कपिल शर्माला मिळालाय. एका कंपनीने केलेल्या सर्व्हेमध्ये कपिलने ‘दबंग’ सलमान खानलाही लोकप्रियतेच्या बाबतीत मागे टाकले आहे

Popularity Kapilchi 'sultan' washed away! | लोकप्रियतेत कपिलची ‘सुल्तान’ला धोबीपछाड !

लोकप्रियतेत कपिलची ‘सुल्तान’ला धोबीपछाड !

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कलाकार होण्याचा मान कॉमेडियन कपिल शर्माला मिळालाय. एका कंपनीने केलेल्या सर्व्हेमध्ये कपिलने ‘दबंग’ सलमान खानलाही लोकप्रियतेच्या बाबतीत मागे टाकले आहे. या सर्व्हेनुसार सलमान खानची लोकप्रियता कमी झाली असून तो पाचव्या स्थानावर फेकला गेलाय. ही कंपनीच्या माध्यामतून छोट्या पडद्यावरील कलाकारांच्या लोकप्रियतेचा सर्व्हे दर महिन्याला केला जातो. कपिलने लोकप्रियतेच्या बाबतीत ‘रोडिज एक्स-4’चा होस्ट रणविजय आणि कॉमेडीयन सुनील ग्रोव्हरलाही मागे टाकले आहे. या सर्व्हेमध्ये चौथे स्थान धकधक गर्ल माधुरी दीक्षितने पटकावले आहे. सध्या माधुरी ‘सो यू थिंक यू कॅन डान्स’ हा रियालिटी शो जज करतेय.

Web Title: Popularity Kapilchi 'sultan' washed away!