पूजा भट्टच्या चित्रपटातडियांड्रा

By Admin | Updated: December 18, 2014 00:35 IST2014-12-18T00:35:43+5:302014-12-18T00:35:43+5:30

बिग बॉसच्या घरातून नुकतीच बाहेर पडलेली डियांड्रा सोरेस लवकरच बॉलीवूडमध्ये पदार्पण करीत आहे.

Pooja Bhatt's film Pachepediaandra | पूजा भट्टच्या चित्रपटातडियांड्रा

पूजा भट्टच्या चित्रपटातडियांड्रा

बिग बॉसच्या घरातून नुकतीच बाहेर पडलेली डियांड्रा सोरेस लवकरच बॉलीवूडमध्ये पदार्पण करीत आहे. व्यवसायाने मॉडेल असलेल्या डियांड्राकडे सध्या दोन चित्रपट आहेत, या दोन्ही चित्रपटांची निर्मिती पूजा भट्ट करणार आहे. डियांड्राने एका वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, ‘सध्या माझ्याकडे दोन चित्रपट आहेत, या दोन्हींची निर्मिती पूजा भट्ट करणार आहे. त्यापैकी एका चित्रपटाचे दिग्दर्शन सोनी राजदान करतील. हा चित्रपट सप्टेंबर, आॅक्टोबरमध्ये सुरू होणार होता; पण मी भाग्यवान आहे. कारण हा चित्रपट आता फेब्रुवारी २०१५ मध्ये सुरू होणार आहे. चित्रपटात माझे हे पहिले पाऊल आहे.

Web Title: Pooja Bhatt's film Pachepediaandra