"तू खूपच एक्सपोज्ड आहेस" हे ऐकताच अभिनेत्रीने सोडली टीव्ही इंडस्ट्री, बॉलिवूडमध्ये केला संघर्ष

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2023 02:48 PM2023-09-21T14:48:04+5:302023-09-21T15:05:19+5:30

करण कुंद्रासोबत होत्या अफेअरच्या चर्चा

कृ्तिका कामरा (Kritika Kamra) टेलिव्हिजनवरील मोस्ट पॉप्युलर अभिनेत्री आहे. तिने अनेक लोकप्रिय मालिकांमधून आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. यातील सर्वात गाजलेली मालिका म्हणजे 'कितनी मोहब्बत है'. यामध्ये तिची आणि एक्स बॉयफ्रेंड करण कुंद्राची केमिस्ट्री खूपच चर्चेत होती.

कृतिकाने करिअरच्या उच्च शिखरावर असतानाच टीव्हीला बाय बाय केलंय तेव्हा तिला तीन चित्रपटांच्या ऑफर्स होत्या. करण जोहर आणि एकता कपूरच्या फिल्ममधून ती इमरान हाश्मीसोबत डेब्यू करणार होती. मात्र तिच्या नशिबात काहीतरी वेगळंच होतं.

कृतिकाचे तीनही चित्रपट डबाबंद झाले. ती सांगते,'अशा प्रकारचे उतार चढाव येतच राहतात. खूप वाईट वाटतं, पण संयम ठेवण्यावाचून तुम्ही काहीच करु शकत नाही. विशेषत: जेव्हा तुम्ही आऊटसाइडर असता. तुम्हाला जसं काम करायचंय त्यासाठी तुम्हाला खूप वाट पाहावी लागते.

आता मागे वळून पाहताना कळतं की त्या प्रतिक्षेचं फळ आज मिळत आहे. आता मला मनासारखं काम मिळत आहे. 'बम्बई मेरी जान'नंतर मला अनेक कॉल्स आले. ज्या मेकर्स आणि लेखकांसोबत मला काम करायची इच्छा होती त्यांचेही फोन आले.

कृतिका सिनेमांमध्ये येत असताना तिला टीव्ही अभिनेत्री म्हणून कमी लेखले गेले. यावर ती म्हणाली, 'आता तसं होत नाही. आधी जेव्हा टीव्ही आणि फिल्म मीडियम होतं तेव्हा असं व्हायचं. फिल्म ऑडिशनवेळी कौतुक व्हायचं पण नंतर ते म्हणायचे तू जरा जास्तच एक्पोज्ड आहेस. फ्रेश चेहरा नाहीए.

हे ऐकल्यानंतर मी काही दिवस स्वत:ला कोंडून घेतलं होतं. सोशल मीडियावर लोक मला विचारायचे की कृतिका कुठेच दिसत नाही. काम का नाही करत, अरे इंडस्ट्री सोडली का? तो काळ फार कठीण होता. घरी बसून गोष्टी नाकारणं सोप्पं नाही. आर्थिक गणितंही जुळवावी लागतात. म्हणूनच मी स्वत:वर असलेला टीव्हीचा टॅग मिटवला.

कृतिकाने बम्बई मेरी जानमध्ये नुकतेच काम केले. तिच्या भूमिकेचं खूप कौतुक होतंय. याशिवाय तिने याआधी तांडव, हश हश या वेबसिरीजमध्येही भूमिका साकारली. तर राजकुमार रावच्या 'भीड' सिनेमातही ती दिसली.

एक्स बॉयफ्रेंड करण कुंद्रासोबत पुन्हा काम करणार का असा प्रश्न विचारला असता ती म्हणाली, 'काही गोष्टी सोडून देणंच चांगलं असतं.' तिच्या या प्रतिक्रियेने काही जखमा भरुन निघत नाहीत हेच स्पष्ट होतं.