ओटीटीवरील 'या' ८ हॉरर वेबसीरिज नक्की पाहा! रात्रीची झोप उडेल, होईल अंगाचा थरकाप!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2025 16:39 IST2025-02-24T16:23:46+5:302025-02-24T16:39:51+5:30

अशा काही भयानक वेबसीरिजची यादी घेऊन आलो आहोत, ज्या तुम्ही कधीही एकट्याने पाहण्याची चूक करू नये.

इंस्पेक्टर ऋषी (Inspector Rishi): ही दक्षिणेतील हॉरर मालिकांपैकी एक आहे. ही एका अशा गावाची कथा आहे, जिथे दररोज कोणाचा तरी खून होतो. या प्रकरणाची जबाबदारी इन्स्पेक्टर ऋषी यांच्यावर येते. मग पुढे कथेत काय ट्विस्ट येतो, हे तुम्हाला मालिका पाहिल्यानंतरच कळेल. ही सीरिज तुम्हाला ओटीटी प्लॅटफॉर्म प्राइम व्हिडीओवर पाहता येईल.

धूता (Dhootha): २०२३ मध्ये आलेली ही साऊथ वेबसीरिज लोकांच्या पसंतीस उतरली आहे. जर तुम्ही ही हॉरर मालिका अजून पाहिली नसेल, तर तुम्ही ती एकदा ओटीटी प्लॅटफॉर्म प्राइम व्हिडीओवर पाहिलीच पाहिजे. या मालिकेत प्राची देसाई आणि नागा चैतन्य मुख्य भूमिकेत दिसले आहेत.

लाइट शॉप (Light Shop): या सीरिजचा पहिला सीझन २०२४ मध्ये प्रदर्शित झाला होता. ही सीरिज तुम्हाला ओटीटी प्लॅटफॉर्म जिओ हॉटस्टारवर पाहता येईल, ज्याला आयएमडीबीवर ७.८ रेटिंग मिळाले आहे.

घोउल (Ghoul): या हॉरर सीरिजमध्ये राधिका आपटेसह अनेक स्टार्स मुख्य भूमिकेत दिसले. यामध्ये, अभिनेत्रीने एका लष्करी अधिकाऱ्याची भूमिका साकारली आहे, ज्यामध्ये ती देशसेवेसाठी तिच्या प्राध्यापक वडिलांना पकडण्यासाठी पोलिसांना मदत करते. मग तिच्यासोबत जे घडते ते पाहून तुम्ही थक्क व्हाल. ही वेबसीरिज OTT प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर पाहता येईल.

बेताल (Betaal): ही हॉरर वेबसीरिज २०२० मध्ये प्रदर्शित झाली होती. ज्यामध्ये विनीत कुमार सिंग, मंजिरी, अहाना कुमारा, सुचित्रा पिल्लई आणि जितेंद्र जोशी यांच्यासह अनेक स्टार्स दिसले होते. ही वेबसीरिज तुम्ही नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहता येईल.

टाइपराइटर (Typewriter): 'टाइपरायटर' ही २०१९ मध्ये प्रदर्शित झालेली एक हॉरर वेबसीरिज आहे, ज्याचं दिग्दर्शन सुजॉय घोष यांनी केलं आहे. या सीरिजमध्ये पालोमी घोष, पूरब कोहली, समीर कोचर यांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत. मालिकेची कथा खूपच रंजक आहे. ही वेबसीरिज तुम्हाला OTT प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर पाहता येईल.

भ्रम (Bhram): २०१९ मध्ये प्रदर्शित झालेली ही वेबसीरिज सायकोलॉजिकल थ्रिलर आहे. या चित्रपटात कल्की कोचलिनने मुख्य भूमिका साकारली आहे. ही OTT प्लॅटफॉर्म ZEE5 वर पाहता येईल.

अधूरा (Adhura): इश्वाक सिंग आणि रसिका दुग्गल स्टारर ही वेबसीरिज प्राइम व्हिडीओवर उपलब्ध आहे. कथेत येणारे ट्विस्ट तुम्हाला थक्क करतील. या सीरिजला IMDb वर 6.6 रेटिंग मिळाले आहे.