हिरामंडी: 'ते मला किस करत होते अन् मी..'; उस्तादजीने सांगितला संजय लीला भन्साळींचा किस्सा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2024 12:35 PM2024-05-14T12:35:45+5:302024-05-14T12:41:13+5:30

Indresh malik: सीरिजच्या प्रीमियर वेळी भन्साळींनी सगळ्यांसमोर मला किस केलं, असा खुलासा इंद्रेशने केला.

संजय लीला भन्साळी यांची हिरामंडी ही वेबसीरिज सध्या सोशल मीडियावर चांगलीच गाजत आहे.

या वेबसीरिजमधील प्रत्येक अभिनेत्रीसोबत आणखी एक भूमिका चर्चिली जात आहे ती म्हणजे उस्ताद जी यांची.

अभिनेता इंद्रेश मलिक यांनी या सीरिजमध्ये उस्ताद जी ही भूमिका साकारली आहे. विशेष म्हणजे त्यांची भूमिका सध्या चांगलीच गाजत आहे.

अलिकडेच इंद्रेशने 'झूम'ला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्याने सीरिजच्या प्रीमिअरला संजय लीला भन्साळींसोबत घडलेला किस्सा सांगितला.

सीरिजच्या प्रीमियर वेळी भन्साळींनी सगळ्यांसमोर मला सतत किस केलं, असा खुलासा इंद्रेशने केला.

"प्रीमियरच्या वेळी मी घामाने चिंब भिजलो होतो आणि त्यावेळी माझ्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले. मला वाटलंही नव्हतं की ते मला मिठी मारतील", असं इंद्रेश म्हणाला.

पुढे तो म्हणतो, "मी त्यांच्या पाया पडायला गेलो तितक्यात त्यांनी मला मिठी मारली आणि माझ्या गालावर किस करायला सुरुवात केली. त्यावेळी मला वाटलं की मी एवढा घामाने भिजलोय आणि त्यांच्या ओठांना घाम लागत असेल. माझ्यामुळे त्यांचे ओठ नक्कीच खारट झाले असतील."

या सीरिजमध्ये इंद्रेश व्यतिरिक्त मनिषा कोइराला, सोनाक्षी सिन्हा, अदिती राव हैदरी, संजीदा शेख, शर्मिन सेगल आणि ऋचा चड्ढा लीड रोलमध्ये झळकल्या आहेत.