'हिरामंडी'च्या 'मल्लिकाजान'च्या सौंदर्यावर लाखो घायाळ; मनिषा कोईरालाचा हेवी लूक चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2024 03:30 PM2024-05-02T15:30:34+5:302024-05-02T15:45:35+5:30

manisha koirala: नुकतंच मनिषाने एक फोटोशूट केलं आहे. हेवी डिझायनर ड्रेसमध्ये तिने हे फोटोशूट केलं आहे.

बॉलिवूडचा एक काळ गाजवणारी लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे मनिषा कोईराला. आजवरच्या कारकिर्दीत तिने अनेक सुपरहिट सिनेमा दिले.

मनिषा कोईरालाचा कलाविश्वातील वावर पूर्वीपेक्षा कमी झाला आहे. मात्र, अद्यापही त्या इंडस्ट्रीत सक्रीय आहेत.

नुकतीच नेटफ्लिक्सवर संजय लीला भन्साळी यांची हिरामंडी ही वेबसीरिज रिलीज झाली.

या सीरिजमध्ये मनिषा कोईरालाने महत्त्वपूर्ण भूमिका साकारली आहे. विशेष म्हणजे या सीरिजमध्ये ती एका नव्या रुपात प्रेक्षकांसमोर आली आहे.

हिरामंडीमध्ये मनिषा कोईरालाने मल्लिकाजान ही भूमिका साकारली आहे. तिची ही भूमिका सध्या सोशल मीडियावर चर्चेत येत आहे.

नुकतंच मनिषाने एक फोटोशूट केलं आहे. हेवी डिझायनर ड्रेसमध्ये तिने हे फोटोशूट केलं आहे.

मरुन रंगाच्या या ड्रेसवर मनिषाने मोजकेच दागिने परिधान केले आहेत. त्यामुळे तिचा हा लूक आणखीनच उठून दिसतोय.