OTT वर जानेवारीत धुमशान; बॉक्स ऑफिस गाजवलेले सिनेमे आणि नवीन सीरीज 'होम स्क्रिन'वर पाहा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2023 05:18 PM2023-12-28T17:18:49+5:302023-12-28T18:36:01+5:30

२०२३च्या शेवटी बॉक्स ऑफिस गाजवलेले सिनेमे २०२४मध्ये ओटीटीवर प्रदर्शित होणार आहेत. जानेवारी महिन्यात हे सुपरहिट चित्रपट ओटीटीवर रिलीज होत असल्यामुळे २०२४ वर्षाची सुरुवात गोड होणार आहे.

२०२३ वर्षांत अनेक बिग बजेट सिनेमे प्रदर्शित झाले. हे वर्ष सरताना अनेक मोठे सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला आले. 'ॲनिमल' पासून ते सॅम बहादूरपर्यंत काही सिनेमे बॉक्स ऑफिसवर हिट ठरले.

२०२३च्या शेवटी बॉक्स ऑफिस गाजवलेले हे सिनेमे २०२४मध्ये ओटीटीवर प्रदर्शित होणार आहेत. जानेवारी महिन्यात हे सुपरहिट चित्रपट ओटीटीवर रिलीज होत असल्यामुळे २०२४ वर्षाची सुरुवात गोड होणार आहे.

Animal : १ डिसेंबरला प्रदर्शित झालेल्या 'ॲनिमल' सिनेमाने बॉक्स ऑफिस दणाणून सोडलं. रणबीर कपूर, अनिल कपूर, बॉबी देओल, रश्मिका मंदाना अशी तगडी स्टारकास्ट असलेल्या या सिनेमाने बॉक्स ऑफिसवरील अनेक रेकॉर्ड मोडले. या सिनेमाने तब्बल ५०० कोटींहून अधिक गल्ला जमवला.

Sam Bahadur :'ॲनिमल'बरोबरच विकी कौशलचा सॅम बहादूरही थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. भारतीय लष्करातील पहिले मार्शल सॅम माणेकशॉ यांच्या जीवनावर आधारित असलेल्या हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला. या सिनेमातील विकीच्या अभिनयाचं सर्वत्र कौतुक झालं. २०२३च्या डिसेंबरमध्ये प्रदर्शित झालेला हा सिनेमा २०२४ मध्ये ओटीटीवर रीलिज होणार आहे.

Do patti : क्रिती सेनॉन आणि काजोल मुख्य भूमिकेत असलेला 'दो पत्ती' हा सिनेमा जानेवारी महिन्यात नेटफ्लिक्सवर प्रदर्शित केला जाणार आहे. क्रिती सेनॉनने या सिनेमाची निर्मिती केली आहे.

Killer Spoup : मनोज बाजपेयी आणि कोंकणा सेन यांच्या मुख्य भूमिका असलेली क्राइम सिरीज 'किलर सूप' ११ जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नेटफ्लिक्सवर ही सीरिज प्रदर्शित होणार आहे.

Police Force season 1 : रोहित शेट्टी दिग्दर्शित पोलीस फोर्सचा पहिला सीझन जानेवारीत अॅमेझॉनवर प्रदर्शित करण्यात येणार आहे. या सिनेमात सिद्धार्थ मल्होत्रा, शिल्पा शेट्टी आणि विवेक ओबेरॉय यांच्या मुख्य भूमिका आहेत.

Karma Calling : रवीना टंडन मुख्य भूमिकेत असलेली 'कर्मा कॉलिंग' ही वेब सीरिज नववर्षात प्रदर्शित होणार आहे. या सीरिजमधून वरुण सूद ओटीटीवर पदार्पण करत आहे. हॉटस्टारवर ही सीरिज प्रेक्षकांना पाहता येणार आहे.

Boy Swallows Universe : 'बॉय स्वॅलो युनिव्हर्स' या पुस्तकावर आधारित असलेली वेब सीरज नव्या वर्षांत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Masters Of Universe Revolution : स्काय फाय फ्रँचाइजीची 'मास्टर्स ऑफ युनिव्हर्स रिव्हॉल्युशन' ही सीरीज नेटफ्लिक्सवर २५ जानेवारीला प्रदर्शित होणार आहे.

Fool Me Once Season : आपल्या लहान मुलाच्या सुरक्षिततेसाठी लावलेल्या कॅमेऱ्यात मृत पती दिसतो. त्यानंतर माया स्टर्न पतीच्या मृत्यूमागील सत्यतेचा शोध घेते. १ जानेवारीला या सीरिजचा पहिला सीझन प्रदर्शित केला जाणार आहे.

Griselda : Griselda ही वेब सीरिजही नववर्षात प्रदर्शित होणार आहे.