राजकारणापासून दूर आहे रामदास आठवलेंचा लेक; फिटनेस अन् स्टाइलमुळे बॉलिवूड कलाकारांवर देतोय मात

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2022 08:00 AM2022-06-24T08:00:00+5:302022-06-24T08:00:00+5:30

Jeet athavale:जीत राजकारणापासून दूर असल्याचं सांगण्यात येतं. मात्र, सोशल मीडियावर तो कमालीचा सक्रीय आहे.

केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले त्यांच्या राजकीय कारकिर्दीसह कवितांमुळेही विशेष लोकप्रिय आहेत.

समाजकारणात सक्रीयपणे काम करणारे रामदास आठवले राजकीय घडामोडींसह त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत येत असतात.

किचन कल्लाकार या कार्यक्रमात लवकरच रामदास आठवले सपत्नीक हजेरी लावणार आहेत. त्यामुळे या शोचा एक प्रोमो व्हायरल होत आहे.

सोशल मीडियावर सक्रीय असलेल्या रामदास आठवले यांच्या पत्नीविषयी साऱ्यांनाच ठावूक आहे. मात्र, यावेळी त्यांच्या मुलाची चर्चा होताना दिसते.

किचन कल्लाकारमध्ये रामदास आठवले व त्यांच्या पत्नीसह मुलानेही हजेरी लावली होती. तेव्हापासून तो चर्चेत येत आहे.

रामदास आठवले यांच्या लेकाचं नाव जीत आठवले असं आहे.

जीत राजकारणापासून दूर असल्याचं सांगण्यात येतं. मात्र, सोशल मीडियावर तो कमालीचा सक्रीय आहे.

सोशल मीडियावर सक्रीय असलेला जीत कायम त्याच्याविषयीचे अपडेट नेटकऱ्यांसोबत शेअर करत असतो.

जीत ‘सोन्या’ या चित्रपटातही झळकल्याचं सांगण्यात येतं. या चित्रपटाचं दिग्दर्शन मुरली लालवाणी यांनी केलं आहे.

जीत गुड लुकिंग असून त्याचे फोटो सध्या व्हायरल होत आहेत.