लाल रंगाच्या साडीमध्ये मनमोहक दिसतेय स्वीटू, तिच्या अदांवर खिळल्या चाहत्यांच्या नजरा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2021 11:28 IST2021-12-11T11:16:49+5:302021-12-11T11:28:05+5:30

अखेर 'येऊ कशी तशी मी नांदायला' (Yeu Kashi Tashi Mi Nandayala )माालिकेत ​स्वीटू( Anvita Phaltankar ) आणि ओमची अधुरी कहाणी पूर्ण होणार आहे. लवकरच या दोघांचा विवाहसोहळा मालिकेत पाहायला मिळणार आहे.

​स्वीटू आणि ओमचे लग्न पाहणे रसिकांसाठी नक्कीच आनंदाची बाब असणार आहे.

या फोटोंमध्ये नववधू स्वीटूचा अंदाज कुणालाही घायाळ करणारा असल्याचे पाहायला मिळत आहे.

नववधूप्रमाणे नटलेल्या आणि साजश्रृंगार केलेल्या स्वीटूचा हा लूक रसिकांनाही तितकाच भावतो आहे.

लाल रंगाच्या साडीमध्ये स्वीटूचं सौंदर्यं आणखीनच खुलून गेले आहे.

स्वीटूचा हा अंदाज पाहून चाहतेसुद्धा लाईक्स आणि कमेंट्स करत असल्याचे पाहायला मिळतंय.

स्वीटूच्या फोटोंनी सोशल मीडियावर सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहेत.

व्हायल झालेल्या फोटोंमध्ये तिच्या विविध अदा पाहायला मिळत आहेत.

ज्या क्षणाची चाहते आतुरतेने वाट पाहत होते तो क्षण मालिकेत पाहायला मिळणार आहे.