'रामायणा'तील शूर्पणखा आता कशी दिसते? कलाविश्वापासून गेलीये खूप दूर
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2023 13:23 IST2023-08-14T13:10:57+5:302023-08-14T13:23:27+5:30
Renu khanolkar: या मालिकेत अभिनेत्री रेणू धारीवाल अर्थात रेणू खानोलकर यांनी शूर्पणखाची भूमिका साकारली होती.

रामानंद सागर यांची तुफान गाजलेली मालिका म्हणजे रामायण. आजदेखील ही मालिका तितकीच लोकप्रिय आहे.
९० च्या दशकात या मालिकेने प्रेक्षकांच्या मनावर गारुड घातलं होतं. त्यामुळे या मालिकेतील प्रत्येक पात्र आणि कलाकार गाजले होते.
सध्या सोशल मीडियावर या मालिकेतील रावणाची बहीण अर्थात शूर्पणखा हिची चर्चा रंगली आहे.
या मालिकेत अभिनेत्री रेणू धारीवाल अर्थात रेणू खानोलकर यांनी शूर्पणखाची भूमिका साकारली होती.
रेणू यांना कुटुंबाच्या विरोधात जाऊन अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं होतं. विशेष म्हणजे रामायणनंतर त्यांना अनेक मालिका मिळाल्या.
रामायणामधील शूर्पणखेची भूमिका त्यांनी अत्यंत सुंदररित्या साकारली होती. त्यामुळे त्यांचं क्रूर हास्य, आजही अनेकांचा थरकाप उडवतो.
कलाविश्वात ठराविक काळ गाजवल्यानंतर त्या इंडस्ट्रीतून बाहेर पडल्या. त्यामुळे त्या सध्या कुठे आहेत, काय करतात असे प्रश्न नेटकऱ्यांना पडतात.
कलाविश्वात काम करत असतानाच रेणू यांनी राजकारणातही प्रवेश घेतला होता. एका मोठ्या राजकीय पक्षाच्या त्या कार्यकर्त्या होत्या.
गेल्या काही वर्षांमध्ये रेणू यांनी कलाविश्वातून काढता पाय घेतला आहे. तसंच त्यांनी राजकारणालाही अलविदा केलं आहे.
सध्या रेणू त्यांच्या पती आणि मुलासोबत अंधेरीमध्ये राहतात.
रेणू यांचं विदेशातही घर असल्याचं म्हटलं जातं.