PHOTOS : 'स्वराज्य रक्षक संभाजी'मधील छोटी येसूबाई आता दिसते अशी; दिसणार या नव्या मालिकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2023 07:00 AM2023-02-28T07:00:00+5:302023-02-28T07:00:00+5:30

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका स्वराज्य रक्षक संभाजीमधील छोटी येसूबाई साकारणारी ती बालकलाकार तुम्हाला आठवत असेल. आता ती खूप मोठी झाली आहे. ती नव्या मालिकेतून कमबॅक करते आहे.

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका स्वराज्य रक्षक संभाजीमधील छोटी येसूबाई साकारणारी ती बालकलाकार तुम्हाला आठवत असेल. आता ती खूप मोठी झाली आहे. ती नव्या मालिकेतून कमबॅक करते आहे.

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय ऐतिहासिक मालिका स्वराज्य रक्षक संभाजी बंद होऊन बराच काळ लोटला आहे. मात्र या मालिकेतील कलाकार आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून कायम आहेत.

या मालिकेतील छोट्या येसूबाई यांची भूमिका साकारणाऱ्या या चिमुरडीने देखील प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे.

छोट्या येसूबाईंची भूमिका बालकलाकर आभा बोडस हिने साकारली होती. आभाच्या गोड, निरागस अभिनयाने तिने सर्वांचे मन जिंकले होते.

स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेमुळे आभाला घराघरात लोकप्रियता मिळाली. स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेत काम करत असताना ती अवघी सहावी इयत्तेत शिकत होती.

छोटी येसूबाई आता मोठी झाली असून आभा लवकरच नव्या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येतेय. अभिनेत्री आभा बोडस झी मराठीवरील 'चंद्रविलास' या नव्या हॉरर मालिकेत दिसणार आहे. मालिकेचा पहिला प्रोमो नुकताच रिलीज झालाय.

स्वराज्य रक्षक संभाजीमधील छोट्या आभामध्ये खूप बदल झाले आहेत. चंद्रविलासमध्ये ती शरू ही भूमिका साकारणार आहे. अभिनेते सागर देशमुख यात तिच्या वडिलांच्या भूमिकेत आहे.

चंद्रविलास ही मालिका २२ मार्च पासून रात्री ११ वाजता झी मराठीवर सुरू होणार आहे.