'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजीची खऱ्या आयुष्यातील लेकही आहे प्रसिद्ध अभिनेत्री, दिसते इतकी हॉट की...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2025 12:12 IST2025-07-14T12:05:59+5:302025-07-14T12:12:51+5:30

ज्योती चांदेकर यांच्या ऑनस्क्रीन लेकीची भूमिका अभिनेत्री शिल्पा नवलकरने साकारली आहे. ज्योती यांची खऱ्या आयुष्यातील लेकही प्रसिद्ध अभिनेत्री आहे.

'ठरलं तर मग' ही मराठी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय मालिका. या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली होती.

या मालिकेतील सायली-अर्जुनच्या जोडीसोबतच पूर्णा आजीदेखील प्रेक्षकांना भावली. मालिकेत पूर्णा आजीची भूमिका अभिनेत्री ज्योती चांदेकर साकारत आहे.

तर ज्योती चांदेकर यांच्या ऑनस्क्रीन लेकीची भूमिका अभिनेत्री शिल्पा नवलकरने साकारली आहे. ज्योती यांची खऱ्या आयुष्यातील लेकही प्रसिद्ध अभिनेत्री आहे.

आज आईप्रमाणेच ज्योती यांची लेकही मराठी सिनेसृष्टी गाजवत आहे. ही अभिनेत्री म्हणजे दुसरी तिसरी कोणी नसून तेजस्विनी पंडित आहे.

आईच्या पावलावर पाऊल ठेवूनच तेजस्विनीनेदेखील अभिनयात करिअर केलं.

अनेक मालिका, जाहिराती, चित्रपटांमध्ये तेजस्विनी झळकली आहे. याशिवाय तिने काही वेब सीरिजमध्येही काम केलं आहे.

तेजस्विनी 'येरे येरे पैसा ३'मधून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

अभिनेत्री असण्याोबतच तेजस्विनीने निर्मिती क्षेत्रातही पाऊल टाकलं आहे. यासोबतच ती एक उद्योजिकादेखील आहे.