'साथ निभाना साथिया'फेम राशीने दिली गुडन्यूज; दुसऱ्यांदा होणार आई
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2022 16:26 IST2022-08-24T16:19:34+5:302022-08-24T16:26:18+5:30
rucha hasabni: साथ निभाना साथिया या मालिकेनंतर रुचा हिचा कलाविश्वातील वावर कमी झाला. सध्या रुचा तिच्या संसारात रममाण आहे.

'साथ निभाना साथिया' या मालिकेच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे रुचा हसबनीस.
या मालिकेत राशी ही भूमिका साकारुन तिने विशेष लोकप्रियता मिळवली.
साथ निभाना साथिया या मालिकेनंतर रुचा हिचा कलाविश्वातील वावर कमी झाला. सध्या रुचा तिच्या संसारात रममाण आहे.
अलिकडेच रुचाने सोशल मीडियावर तिच्या सेकंड प्रेग्नंसीची बातमी शेअर करत चाहत्यांना आनंदाचा धक्का दिला आहे.
अलिकडेच रुचाने मॅटर्निटी फोटोशूट केलं असून यातील काही फोटो चर्चेत आले आहेत.
रुचाने ही गोड बातमी सांगितल्यापासून सोशल मीडियावर तिची चर्चा रंगली आहे.
रुचाने २६ जानेवारी २०१५ मध्ये प्रियकर राहुल जगदाळेसोबत लग्न केलं.
१० डिसेंबर २०१९ मध्ये रुचाने तिची पहिली मुलगी रुही हिला जन्म दिला.