Navratri 2025: सुंदरा भरेल मनात! आरजे महवशचा नवरात्री स्पेशल लूक, फोटो चर्चेत!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2025 18:19 IST2025-09-22T18:13:48+5:302025-09-22T18:19:55+5:30
आरजे महवश हिचा हा लूक गरबा नाईटसाठी हा एक परफेक्ट आहे.

नवरात्रोत्सवाला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे. प्रत्येकजण आपल्या परीने हा उत्सव साजरा करतो. नवरात्रोत्सवात गरबा नृत्याचं विशेष आकर्षण असतं. नुकतंच आरजे महवश ही गरबा लूकमध्ये दिसली.
आरजे महवशनं इन्स्टाग्रामवर खास फोटो शेअर केले आहेत. या फोटोंना तिनं "संस्कार आणि बंदूक दोन्ही ठेवते" असं कॅप्शन दिलं.
हा हटके लुक कॅरी करण्यासाठी तिनं ब्राऊन बेसची निवड केली होती. यावेळी तिने ब्राऊन रंगाची सिंपल लिपस्टिक लावून आयशॉडो, काजळ लावून तिचा लुक पूर्ण केला.
या खास लूकसाठी आरजे महवशनं कानात झुमके, हातात बांगड्या व गळ्यात सुंदर दागिने परिधान केले होते. ज्यामुळे तिचा लूक अधिकच आकर्षण दिसत होता.
लाल आणि काळ्या रंगाच्या पारंपरिक घागरा-चोळीमध्ये आरजे महवश खूपच उठावदार दिसली.
आरजे महवश हिचा हा लूक गरबा नाईटसाठी हा एक परफेक्ट आहे.
तिचा हा पाठमोरा फोटो तर हटके आणि बोल्ड दिसतोय. ज्यामुळे तिच्या घागऱ्याला रॉयल लुक मिळालाय.
आरजे महवशच्या या फोटोंवर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
धनश्री वर्मासोबतच्या घटस्फोटानंतर युजवेंद्र चहल हा आरजे महवशला डेट करत असल्याची चर्चा आहे. दोघांचे काही फोटो आणि व्हिडीओही व्हायरल झाले आहेत.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, आरजे महवश २८ वर्षांची आहे. तिनं रेडिओ जॉकी म्हणून काम केलंय. तसेच ती अभिनेत्री, कंटेंट क्रिएटर, लेखक आणि होस्टसुद्धा आहे.