रामायणात सीतेच्या भूमिकेत दिसलेल्या दीपिका चिखलिया खऱ्या आयुष्यात आहेत खूप स्टायलिश, पाहा त्यांचे हे फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2020 13:05 IST2020-04-25T13:03:00+5:302020-04-25T13:05:02+5:30

लॉकडाऊनमुळे प्रेक्षकांना रामायण ही त्यांची आवडली मालिका पुन्हा एकदा पाहायला मिळत आहे.

या मालिकेत सीतेच्या भूमिकेत आपल्याला दीपिका चिखलिया यांना पाहायला मिळाले होते. दीपिका या इन्स्टाग्रामवर चांगल्याच सक्रिय असून त्या त्यांचे अनेक फोटो इन्स्टावर पोस्ट करत असतात.

रामायण ही मालिका पुन्हा सुरू झाल्यापासून दीपिका यांच्या इन्स्टाग्राम फॉलोव्हर्समध्ये वाढ झाली आहे.

दीपिका यांच्या इन्स्टाग्रामच्या अकाऊंटवर आपल्याला त्यांचे अनेक ग्लॅमरस फोटो पाहायला मिळतात.

दीपिका यांचे हे ग्लॅमरस आणि स्टायलिश फोटो त्यांच्या फॅन्सना प्रचंड आवडत आहेत.

दीपिका यांनी रामायण या मालिकांप्रमाणे अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केले.

दीपिका यांनी रामायणात सीतेची भूमिका साकारल्यानंतर कधीच छोट्या अथवा मोठ्या पडद्यावर शॉर्ट कपडे घातले नाहीत.

रामायण या मालिकेमुळे दीपिका यांना चांगलीच लोकप्रियता मिळाली. आजही इतक्या वर्षांनी त्यांच्या लोकप्रियतेत काहीही फरक पडलेला नाहीये.

टॅग्स :रामायणramayan