'सीता' फेम अभिनेत्री दीपिका चिखलियाच्या लेकींना पाहिलंत का? लाइमलाइटपासून आहेत खूप दूर
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2025 16:00 IST2025-05-12T15:30:18+5:302025-05-12T16:00:54+5:30
रामायण मालिकेत सीतेची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री दीपिका चिखलिया यांच्या मुली काय करतात? आईप्रमाणे अभिनय क्षेत्रात येणार का? जाणून घ्या एका क्लिकवर

'रामायण' मालिका चांगली गाजली. या मालिकेतील सर्वच कलाकारांवर प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम केलं. या मालिकेत सीतेची भूमिका अभिनेत्री दीपिका चिखलिया यांनी साकारली.
दीपिका चिखलिया यांची मुलगी काय करते? असा प्रश्न अनेकांना पडला असेल. दीपिका चिखलिया यांना दोन मुली आहेत.
दीपिका यांच्या मुलींचं नाव आहे जूही आणि निधी. दीपिका यांच्या दोन्ही मुली मनोरंजन विश्वापासून दूर आहेत.
दीपिका यांच्या दोन्ही मुली दिसायला आईसारख्याच सुंदर आहेत. दीपिका यांची मुलगी जूही ही मेकअप आर्टिस्ट आहे. जूही सोशल मीडियावर सक्रीय असून ती मेकअप संदर्भातले व्हिडीओ शेअर करत असते
दीपिका यांची दुसरी मुलगी निधी मात्र तिचं वैयक्तिक आयुष्य प्रायव्हेट ठेवणं पसंत करते. त्यामुळे निधी काय करते याविषयी माहिती उपलब्ध नाही
दीपिका लवकरच एका मराठी सिनेमात दिसणार आहेत. विशेष म्हणजे या सिनेमात त्यांच्यासोबत रामायण मालिकेतील राम अर्थात अरुण गोविल दिसणार आहेत.
दीपिका सध्या मनोरंजन विश्वातून ब्रेक घेत त्यांच्या कुटुंबाकडे लक्ष देताना दिसतात. दीपिका त्यांच्या कुटुंबासोबतच्या फोटोंनी सर्वांचं लक्ष वेधतात