लवकरच स्टार प्लस वाहिनीवर 'जाना ना दिल से दूर' ही नवी मालिका सुरू होत आहे. आपली मराठी मुलगी शिवानी सुर्वे मालिकेत प्रमुख भूमिका साकारत आहे.'विविधा' अतिश्रीमंत कुटुंबात वाढलेली तर 'अथर्व' गरीब शिक्षित पण गाईचा कळप सांभाळणाऱ्या तरुण असतो. एकमेकांपेक्षा एकदम भिन्न परिस्थितीत वाढलेल्या विविधा आणि अथर्वची हृदयस्पर्शी प्रेमकथा यामध्ये पाहायला मिळणार आहे. कथानकाला राजस्थानची पार्श्वभूमी असल्यामुळे तेथील संस्कृती तंतोतंत दाखविण्यासाठी निर्मात्यांनी पुष्कर शहरात जगप्रसिद्ध 'पुष्कर मेळाव्या'चा भव्यदिव्य सेट उभारला होता. 'सीएनएक्स'ने थेट पुष्करला जाऊन या सेटवर भेट दिली. त्याची क्षणचित्रे खास तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.मेळवा पूर्णपणे जिवंत करण्यासाठी सेटवर बांगड्या, साड्या, सजावट केलेली मातीची भांडी आणि राजस्थानी कलावस्तूंची 30 पेक्षा जास्त दुकाने व 40 फुट उंच 'जायंट' रहाटपाळणा, 30 उंट, 40 गाई आणि मेंढ्या-शेळ्यांचा कळप आणि शेकडो स्थानिक कलाकारांचा सामावेश होता. 'जाना ना दिल से दूर'च्या सेटवरदेखील राजस्थानी लोककलावंतांच्या पाच गु्रप्सला आमंत्रित करण्यात आले होते. त्यांच्या दिलखेचक अदा आणि सादरीकरणाने मालिकेच्या प्रसंगात अनेक रंग भरले. कथानकाच्या एका महत्त्वाच्या भागात प्रमुख पात्र विविधा आणि अथर्व पुष्कर मेळाव्याला जातात. तेथे वासरू हरवल्यामुळे दोघे संपूर्ण मेळाव्यात त्याचा शोध घेतात. या सीनची ही छायाचित्रे आहेत.