मराठी मालिकेच्या घरंदाज सुनेचा भलताच 'बोल्ड अन् बिनधास्त' लूक, नव्या फोटोशूटची चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2024 04:26 PM2024-04-18T16:26:06+5:302024-04-18T17:12:57+5:30

Purniemaa Dey hot sexy look: 'कुण्या राजाची गं तू रानी' मालिकेतल्या मृण्मयीच्या बोल्ड लूकची चर्चा

Purniemaa Dey hot sexy look: पूर्णिमा डे ही मराठी मनोरंजन विश्वातील 'बिनधास्त' अभिनेत्री. 'तुला पाहते रे' मालिकेतून ती मराठी इंडस्ट्रीत आली. त्यात तिने उच्चभ्रू कुटुंबातील घरंदाज सुनेची भूमिका केली होती.

शर्वरी जोग आणि हर्षद आतकरी यांच्या मुख्य भूमिका असलेल्या स्टार प्रवाह चॅनेलवरील 'कुन्या राजाची गं तू राणी' या मालिकेत सध्या पूर्णिमा मृण्मयीची भूमिका साकारतेय.

पूर्णिमा हे कायमच आपल्या बोल्ड आणि ग्लॅमरस लूक साठी चर्चेत असते. नुकतीच तिने स्टार प्रवाह परिवार पुरस्कार सोहळ्यातही आपल्या अदांनी साऱ्यांना 'क्लीन बोल्ड' केलं होतं.

अल्पावधीतच मराठी मनोरंजन विश्वात स्वतःच्या अभिनयाची छाप सोडणाऱ्या पूर्णिमाने नवा बोल्ड अँड बिनधास्त फोटोशूट केला आहे.

रिअल लाईफ अजून तरी सिंगल असं रिलेशनशिप स्टेटस सांगणारी पूर्णिमा सोशल मीडियावरील नव्या फोटोशूटमुळे चांगलीच चर्चेत आहे.

करियरच्या सुरुवातीला घरंदाज सुनेचा रोल करणारी पूर्णिमा गुलाबी रिव्हिलिंग टॉप आणि लाँग स्कर्टमध्ये खूपच मादक दिसतेय. चाहत्यांनाही तिचा हा लूक चांगलाच भावला आहे.