IN PICS:१२ वर्षात इतकी बदलली 'बालिका वधू'ची आनंदी, आता दिसते खूपच सुंदर !

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2020 15:27 IST2020-09-14T15:16:09+5:302020-09-14T15:27:20+5:30

आज अविका ही २३ वर्षाची आहे. ही मालिका बंद होवून इतकी वर्ष झाली तरी आजही तिला छोटी आनंदी म्हणूनच चाहते ओळखतात.

'बालिका वधू'मध्ये छोट्या आनंदीची भूमिका साकारणारी अविका गौरला मालिकेने प्रचंड प्रसिद्धी मिळवून दिली. अगदी लहान वयात तिने या मालिकेत काम करायला सुरूवात केली तेव्हा ती केवळ ९ वर्षाची होती.

“बालिक वधूने माझे जीवन पूर्णपणे बदलून गेले आणि मला अनेक गोष्टी शिकण्याची संधी त्यातून मिळाली. बालिकावधू मध्ये अभिनय करणे हा एक छंद व आवड होती जे मी नंतर सुरू ठेवले आणि तेही मोठ्या प्रमाणावर.

प्रत्येक दिवशी नवीन पोशाख घालणे, लोकांचे खूप प्रेम मिळवणे, आणि टेलिव्हिजनवर दिसणे यात मला आनंद वाटत होता.

माझ्यासाठी, 'बालिका वधू' म्हणजे फिल्म शाळाच होती ज्यात मला अभिनयाच्या अनेक सूक्ष्म छटा शिकायला मिळाल्या.

मी सेटवरील सर्वात आनंदी व्यक्ती होते आणि प्रत्येक क्षणाचा आनंद घेत होते. आज मी जी काही आहे तशी अभिनेत्री बनवण्याचे श्रेय मी या शोला देईन असे तिने सांगितले.

'बालिका वधू'नंतर तिने काम सुरूच ठेवले होते. 'ससुराल सिमर का' मालिकेत ती झळकली. तिने साकारलेली रोली या भूमिकेलाही रसिकांची भरघोस पसंती मिळवली होती.

बहूच्या भूमिकेत झळकत तिने पुन्हा एकदा रसिकांचे मनोरंजन केले. आता मालिकेत झळकत नसली तरी सोशल मीडियावर ती प्रचंड सक्रिय असते.

तिचे नवनवीन व्हिडीओ, फोटो शेअर करत ती चाहत्यांची पसंती मिळवत असते. तिच्या विविध अंदाजातील फोटोंनाही चाहते लाईक्स आणि कमेंटस देत वाहवा करत असतात.

हिंदी मालिकेनंतर ती दाक्षिणात्य इंडस्ट्रीत प्रसिद्धीच्या झोतात राहिली. अविका अनके कार्यक्रमांना हजेरी लावत असते. त्यासाठी ती एक ते दोन लाखांपर्यंतचं मानधन घेते.